जामखेड बाजार समिती आवारात कडा बाजार समितील प्रसिद्ध कांदा व्यवसाईक अलंकार ट्रेडर्सच्या शाखेचे उद्घाटन संपन्न
जामखेड प्रतिनिधी
जामखेड बाजार समिती आवारात कडा बाजार समितील प्रसिद्ध कांदा व्यवसाईक अलंकार ट्रेडर्सच्या शाखेचे उद्घाटन संपन्न झाले असून पुढील काळामध्ये जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना अहमदनगर सोलापूर कडा येथे जाण्याची गरज पडणार नाही. सोलापूर व अहमदनगरच्या धरतीवर जामखेड बाजार समितीमध्ये कांदा कांद्याला विक्रमी भाव मिळणार आहे. तरी जामखेड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपला कांदा जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये सुरू केलेल्या कांदा मार्केट मधे विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी केले आहे.
यावेळी जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, उपसभापती कैलास वराट, कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी, जामखेड मार्केट कमिटीचे संचालक सचिन घुमरे, नंदू गोरे, विठ्ठल चव्हाण, सुधीर राळेभात, डॉ. गणेश जगताप, बबनराव हुलगुंडे, सुरेश पवार, गजानन शिंदे, सतीश शिंदे, राहुल बेदमुथा, सचिव वाहेद सय्यद, व अलंकार ट्रेडर्सचे मालक बबलू शेठ तांबोळी तसेच सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत अलंकार ट्रेडर्स या नवीन कांदा अडतीचे उद्घाटन करण्यात आले. आज दि. १४ नोव्हेंबर रोजी अलंकार ट्रेडर्स येथे झालेल्या कांदा निलावामध्ये विक्रमी असे पाच हजार पाचशे रुपयेभाऊ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला.
चौकट









