श्री नागेश्वर मंदिर व खंडोबा मंदिर येथे दीपोत्सव उत्साहात साजरा.
जामखेड प्रतिनिधी
श्री शिवराज्याभिषेक उत्सव समिती जामखेड व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका आयोजित भव्य दीप महोत्सवाची सुरुवात जामखेडचे कुलदैवत श्री नागेश्वर मंदिरापासून सुरुवात झाली यावेळी शेकडो शिवभक्त ग्रामस्थ महिलानीं महोत्सव मध्ये सहभाग घेतला.
सुरुवातीला श्री नागेश्वर महादेवाचे आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करून दीपोत्सव आकर्षक पद्धतीने मांडणी करून दिवे लावण्यात आले. या उत्सवात जामखेड शिवभक्त, ग्रामस्थ ,महिला भगिनींनी उत्साहाने सहभाग घेतला. दिवे लावल्यानंतर फटाकड्यांचे आतिषबाजी करण्यात आली. शेवटी श्री खंडोबा मंदिर जामखेड येथे शिवराज्याभिषेक समितीने शेकडो दिवे लावून परिसर दिव्याच्या प्रकाशाने उजळून गेला सर्वत्र प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. या उपक्रमाचे समस्त ग्रामस्थांनी कौतुक केले.
यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका वत्तीने प्रतिवर्षाप्रमाणे दीपोत्सवाची सुरुवातच मोठ्या उत्साहात केली जाते तसेच ऐतिहासिक क्षेत्र किल्ले शिवपट्ठन खर्डा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राजवाडा चोंडी, अशा विविध ऐतिहासिक धार्मिक ठिकाणी प्रती वर्षी मोठ्या जल्लोषात धारकरी शिवभक्त दीपोत्सव साजरा करतात.