व्यापाऱ्यांनो सावधान! जामखेडमध्ये ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी सक्रिय
ऑनलाईन व्यवहार करताना सावधानता बाळगा-पो. नि. महेश पाटील
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील काही व्यापाऱ्यांना फोन करून आम्ही एका शाळेतुन बोलत आसुन आम्हाला शाळेचे सामान पाठवुन द्या तुम्हाला ऑनलाईन पेमेंट पाठवतो आसे म्हणून शहरातील दोन व्यापाऱ्यांची फसवणुक होताना व्यापाऱ्यांच्याच सावधगिरीने टळली आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना सावधानता बाळगावी असे आवाहन पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरातील काही नागरिक व व्यवसायीक यांना फोन येतो. प्रसिद्ध ठिकाणचे लोकेशन दिले जाते. या ठिकाणी काही तुमच्या दुकानातील सामान पाठवा, दुकानदाराला वाटते मोठे ग्राहक आहे म्हणून रिक्षाद्वारे माल पाठवला जातो तर त्या ठिकाणी कोणीही नसते ज्यांनी फोन केला होता. त्यांना फोन केल्यानंतर ते म्हणतात आम्ही बाहेर आहोत माल उतरा व बीलासाठी स्कॅनर पाठवा किंवा फोन पे वर एक रुपया पाठवा असे म्हणतात आपल्या अकाउंटची माहिती घेतात ओटीपी सांगा म्हणतात. असे शहरातील दोन व्यावसायिक लोकांच्या बाबतीत घडले आहे. पण सुदैवाने त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी फसवणूक झाली नाही. शहरात रोजच कोणाला तरी असे फोन येत आहेत. सध्या अनेक व्यवहार ऑनलाईन होतात. याचाच गैरफायदा घेत काही भामटे लोक परिसरातील नागरिकांची फसवणूक करत आहेत. अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
शहरात गेल्या चार पाच दिवसांपासून शहरात ऑनलाईन फसवणूक करणारी एक टोळी सक्रिय आहे. अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील एका इलेक्ट्रॉनिक दुकानदाराला आँनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीतील एकाच
9109346193 या नंबर वरुन फोन आला व आम्हाला पाच फॅन, दहा बल्ब, वायर बंडल असे साहित्य शहरातील एका विद्यालयात पाठवा असे फोन द्वारे सांगितले दुकानदाराला वाटले मोठी आर्डर आहे. म्हणून लगेच साहित्य रिक्षा द्वारे संबंधित ठिकाणी पाठवले तर तेथे कोणीच नव्हते.
संबंधित दुकानदाराने विद्यालयाचे प्राचार्य यांना याबाबत कळविले तर प्राचार्य म्हणतात आम्ही अशी कोणतीही आर्डर दिली नाही. तरी मी चौकशी करतो. नंतर कळले की, कोणीही तशी आर्डर दिली नाही. संबंधित व्यक्तीला फोन केला तर ते म्हणाले की, आम्ही कामात बाहेर आहोत. तुम्ही माल उतरून घ्या एक कॅनर पाठवले आहे यावर एक रूपया पाठवा म्हणजे तुमचे बील आम्ही पाठवतो. यानंतर संबधित व्यापाऱ्यांने एक रूपया पाठवला यावर परत दोन रुपये पाठवले. व दुसरा फोन पे नंबर देत परत एक रूपया पाठवण्यास सांगितले. मात्र दुकानदाराला संशय आल्याने फोन पे वर रुपया न पाठवता माल परत आणला यामुळे त्या दुकानदाराची फसवणूक होऊ शकली नाही.
याबाबत जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणजे की, विना नंबर व्हिडिओ कॉल घेऊ नयेत, तसेच तुमचा नंबर लकी आहे. तुम्हाला एवढे बक्षीस लागले आहे. तसेच काही लिंक पाठवतात हे सर्व फसवे आहे. कोणीही अशा लिंक ओपन करू नये. ज्यांना कोणाला असे फोन येतील तर ताबडतोब पोलीसांना कळवा पोलीस कारवाई करतील.
चौकट
ज्या ठिकाणी माल पाठवण्यास सांगितलेले असते. तेथे कोणीही नसते दिलेल्या पत्यावर विचारले तर कोणतीही आर्डर दिलेली नाही असे सांगितले जाते. चार ते पाच दिवसात दोन तीन घटना घडल्या आहेत. कॅनर पाठवा नंतर फोन पे नंबर पाठवा असे सांगितले जाते यात मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here