ऐन दिवाळीतही जामखेड येथील मराठा बांधवांचे साखळी उपोषण सुरूच
जामखेड येथिल साखळी उपोषणाचा आजचा २० वा दिवस
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्रात काही मराठा बांधवांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या घरात अंधार आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे देखील दिवाळी साजरी करणार नाहीत. याच आनुशंगाने एन दिवाळीतही जामखेड येथे मराठा आरक्षणासाठी चालु आसलेले साखळी उपोषण सुरूच ठेवले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या केलेल्या कुटुंबाच्या घरात सध्या एन दिवाळीत अंधार आहे त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. याच अनुशंगाने जामखेड येथिल तहसील कार्यालयासमोर मराठा बांधवांचे साखळी उपोषण सुरू आहे.
जामखेड तहसील कार्यालयासमोर सुरू आसलेल्या उपोषणात दररोज एक गाव सहभागी होत आहे. सध्या दिवाळीचा सण सुरू आसला तरी पुढील चार दिवस जामखेड शहरातील मराठा बांधव या साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत व हे साखळी उपोषण एन दिवाळीत सुरुच राहीले आहे. त्यामुळे दिवाळीचा सण आसला तरी मराठा बांधवांनी जामखेड येथे सुरु केलेल्या साखळी उपोषणात सर्व मराठा बांधवांसाठी सहभागी होण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा जामखेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
साखळी उपोषणाला वाढता जाहीर पाठिंबा दिसत आहे. विविध संघटना, डॉक्टर असोसिएशन, मुस्लिम समाज, वकील बार, मेडिकल असोसिएशन, ग्रामसेवक संघटना यांनी उपोषणास पाठिंबा दिलेला आहे. जामखेड तालुक्यातील ज्या गावानां मराठा आरक्षणासाठी जामखेड तहसील कार्यालया समोर सुरु आसलेल्या साखळी उपोषणात सहभागी व्हायचे आहे त्यांनी मराठा क्रांती मोर्चा जामखेड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.