मलेशिया येथे उच्च प्रशिक्षणासाठी जामखेड येथील सौ.गायत्री चव्हाण तथा सौ गायत्री भूषण राळेभात यांची निवड
जामखेड प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठात राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे हवामान अद्यावत शेती व जलव्यवस्थापणाचे आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आचार्य पदवीच्या (Ph.D) विद्यार्थिनी सौ. गायत्री चव्हाण तथा सौ गायत्री भूषण राळेभात यांची University putra Malaysia येथे एक महिन्याच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
सौ.गायत्री या सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी येथे कृषी विस्तार विषयामध्ये आचार्य पदवीचे (Ph.D) शिक्षण घेत आहेत. तसेच सौ. गायत्री यांनी बऱ्याच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये सहभाग नोंदवला आहे. तरी सौ. गायत्री चव्हाण (राळेभात) यांचेवर संपूर्ण विद्यापीठातून व जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेण्यासाठी
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या
पदव्युत्तर महाविद्यालयाच्या आचार्य पदवीचे १८ व पुणे कृषी महाविद्यालयाच्या हवामान शास्त्र या विषयातील दोन विद्यार्थी असे एकूण २० विद्यार्थ्यांची मलेशियातील स्कूल ऑफ बिझनेस ॲण्ड इकोनॉमिक्स’मध्ये अद्ययावत हवामान व जलव्यवस्थापन या विषयावरील
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी ही निवड
झाली आहे.