जामखेड रोखठोक…..

शहरातील विंचरणा नदीच्या काठावर भगवान शंकराची मुर्ती ठेवण्यात येत आसलेल्या समोरील बाजूच्या अतिक्रमण आसलेल्या सर्व टपऱ्या आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने भुईसपाट करण्यात आल्या. यावेळी नगरपरिषदेचे कर्मचार्‍यांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

नगरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून ही मुर्ती बनवण्याचे काम सुरू केले होते. त्याच अनुषंगाने रात्री ही शंकराची मुर्ती जामखेड शहरात दाखल झाली. शिल्पकार कांबळे हे मुर्ती बसवण्यासाठी स्वतः जामखेड येथे आले आसुन संपूर्ण पांढरी शुभ्र अशी ही मुर्ती रहाणार आहे. मात्र या मुर्ती च्या समोर गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत काही लोकांनी अतिक्रमण करुन टपऱ्या टाकल्या होत्या. या मुळे मुर्ती दिसण्यास आडचणी येत होत्या. लघुपाटबंधारे विभागाने नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन मोठ्या पोलीस बंदोबस्तात नगर रोडवरील विंचरणा नदीच्या काठावरील सात ते आठ टप-र्या जे सी बी च्या सहाय्याने जमीनदोस्त केल्या. त्यामुळे या ठिकाणी मुर्ती बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अतिक्रमण काढता वेळी शहरात नागरीकांनी मुर्ती पहाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच जामखेड शहरात काही तरी बदल होत आसल्याने देखील समाधान व्यक्त केले आहे. आतिक्रम काढता वेळी जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, नॅशनल हायवे चे कुलांगे साहेब, लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अधिकारी रामभाऊ ढेपे, गणेश काळे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक बडे साहेब यांच्या बंदोबस्तात सदरची अतिक्रमणे काढण्यात आली. आमदार रोहित पवार यांच्या हस्ते दि १४ रोजीी पाठपुजा करुन हे शिल्प बसवण्यात येणार आहे. तर दि १५ रोजी पांडुरंग देवा शास्त्रीी व ब्रम्हवृंद याांच्य हस्ते महापुजा व महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here