मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने सोनेगावच्या महीला सरपंचानी दिला राजीनामा
जामखेड प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे सोनेगावच्या सरपंच सौ. रूपाली पद्माकर बिरंगळ यांनी सरकारचा निषेध व्यक्त करीत आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे.
जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची सोनेगाव ग्रामपंचायत समजली जाते, येथील सरपंच सौ. रुपाली पद्माकर बीरंगळ यांनी मराठा समाजातील मुलांना शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण गेली अनेक वर्षापासून मिळत नाही त्यामुळे अनेक तरुणांच्या पिढ्याच्या पिढ्या बुद्धी कौशल्य असूनही नोकरी न मिळाल्याने बरबाद होत चालल्या आहेत. प्रत्येक पक्ष हा निवडणुकीत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतात, परंतु सत्ता आल्यानंतर प्रत्येक सरकारने मराठा समाजाची निराशाच केलेली आहे.
प्रत्येक राजकीय पक्ष व सत्तेतील सर्व सरकार हे मराठा समाजाचा मतापुरताच वापर करून घेतात व आश्वासने देतात परंतु सत्ता मिळताच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती दिसून येत नाही. अनेक वर्षे झाली मराठा समाज हा लाखो लोकांचे मोर्चे शांततेत काढून आमरण उपोषण करतात मराठा समाजातील युवकांची पात्रता असतानाही आरक्षणा अभावी शिक्षणात आणि शासकीय नोकरीत होणारे नुकसान ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे, मराठा समाजातील तरुणांची हतलबता पाहून माझे मन व्यथीत होत आहे.
कित्येक युवकांनी आजपर्यंत आरक्षण लढ्यासाठी आत्महत्या केल्या आहेत, तरीसुद्धा सरकारची आरक्षण देण्याची इच्छाशक्ती दिसत नाही फक्त आरक्षणाचे गाजर दाखवले जात आहे अशा अनेक बाबींचा विचार करून मी सुद्धा एक मराठा महिला म्हणून सोनेगाव सारख्या मोठ्या गावची सरपंच पदाची धुरा सांभाळत असताना मराठा समाजाच्या आरक्षण मिळण्याच्या व्यथा ऐकून माझी अशा परिस्थितीत काम करीत असताना सरपंच पदाचा त्याग करण्याची इच्छा निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याच्या निषेधार्थ मी सोनेगावच्या सरपंच पदाचा राजीनामा मोठ्या उद्वेगाने देत आहे.
सोनेगावच्या सरपंच सौ. रुपाली पद्माकर बिरंगळ यांनी दिला पदाचा राजीनामा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी १४ ऑक्टोबर रोजी आंतरवली येथे होत असलेल्या मराठा आरक्षण महासभेसाठी उपस्थित राहुन मराठा आरक्षणासाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here