सरकारने कीतीही डाव टाकु द्या आरक्षण घेतल्या शिवाय मागे हटणार नाही – मनोज जरांगे-पाटील
मनोज जरांगे यांच्या सभेत जमली होती अलोट गर्दी
जामखेड प्रतिनिधी
मराठ्यांना आरक्षण दिल्या शिवाय माघार नाही. मी उपोषणाला बसल्यावर व आरक्षणाची मागणी लावुन धरल्या नंतर सरकारने खुप वेग वेगळे डाव टाकले. सरकारने कीतीही डाव टाकु द्या? मराठा समाज्याला आरक्षण मिळाल्या शिवाय मागे हटणार नाही
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची काल दि ६ रोजी रात्री आठ वाजता जामखेड शहरात भव्य आशी महासभा संपन्न झाली. जरांगे पाटील यांचा गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर दौरा सुरू केला आहे याच अनुषंगाने ते काल भुम येथील सभा संपल्यानंतर त्यांचे दुपारी खर्डा या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी चौंडी येथिल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी चौंडी आ. राम शिंदे व सामाजिक कार्यकर्ते सचिन (सर) गायवळ यांच्या सह ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. तसेच तालुक्यातील विविध गावांमध्ये देखील स्वागत करण्यात आले.
रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जामखेड शहरात आगमन होताच जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. स्टेजवर आल्यावर छोट्या मुलींनी त्यांचे औक्षण केले व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. यानंतर त्यांच्या जीवनावर आधारित बनवलेली दहा मीनिटांची व्हीडिओ चित्रफीत दाखवण्यात आली .
जामखेड तहसील कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या सभेत जरांगे पाटील यानी मार्गदर्शन करतेवेळी सांगितले की मी जिवंत आसे पर्यंततरी मराठा आरक्षण मागणीवर ठाम रहाणार आहे. २००४ च्या जीआर च्या दुरुस्तीचा प्रस्ताव देखील सरकारकडे पडुन आहे त्याच्या अटी व शर्ती काढल्या तर कायदा बनवायची गरज नाही. मराठा आणि कुणबी एकच आहेत त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावीत. मराठा समाज्याला आरक्षण मिळाल्या शिवाय माघार नाही मराठा समाजाला मी मायबाप मानले आहे मरेपर्यंत गद्दारी करणार नाही. आरक्षणासाठी सरकारने नेमलेल्या समितीने पाच हजार पुरावे गोळा केले आहेत. त्यामुळे सरकारने चाळीस दिवसाच्या आत कायदा पारीत करावा.
१४ ऑक्टोबरच्या सभेस महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी उपस्थित रहा
एकाही मराठा बांधवांनी खुचुन न जाता आत्महत्या सारखा पर्याय निवडायचा नाही. अंतरवाली सराटी येथे दि १४ ऑक्टोबर २०२३ रोजी होणाऱ्या महासभेस जामखेड तालुक्यातील मराठा बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा. सभेच्या नंतर पुढे दहा दिवस रहात आहेत मात्र सभेला मोठी गर्दी करु सरकारवर दबाव वाढवा त्यामुळे दहा दिवसान एवजी चार Elsewhere आतच आरक्षणाचा जीआर काढायला भाग पाडु आसे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.