महात्मा गांधी जयंती निमित्त व भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व नामदार राम शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून जामखेड शहरातील हजरत इमाम शाह वली दर्गा परीसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवडा स्वच्छतेसाठी ‘एक तारीख, एक तास’ या रविवारी १ ऑक्टोबर रोजीचे औचित्य साधून भाजपच्या वतीने नुकतीच जामखेड येथिल हजरत इमाम शाह वली बाबा दर्गा मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सलीम (भाई) बागवान, कर्जत जामखेड विधानसभा संयोजक जमीर भाई सय्यद, प्राध्यापक जाकिर शेख सर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष बेग साहेब, अमर भाई शेख, ताहेर खान साब, असीम शेख, साजिद सय्यद, धनंजय पवार, डॉ.अल्ताफ शेख, शाकीर खान व इतर कार्यकर्त्यांनी या स्वच्छ भारत अभियान या कार्यक्रमात सहभाग घेऊन परिश्रम घेतले.
महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं रविवार दि 1 ऑक्टोबरला देशभरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. या भव्य स्वच्छता मोहिमेत सर्वांनी किमान एक तास श्रमदान करून, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छता करणे हिच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल असं मत भाजपचे कर्जत जामखेड विधानसभा संयोजक जमीर भाई सय्यद यांनी व्यक्त केले.