ईडब्ल्यूएस प्रमाणे केंद्र सरकारने धनगर व मराठा आरक्षणाचा प्रश्र सोडवावा – आ. रोहित पवार
जामखेड प्रतिनिधी
केंद्र सरकारने ईडब्ल्यूएस कोटा पार्लमेंटमध्ये घटना दुरुस्ती करुन पास केला. तीथे पन्नास टक्याच्या पुढे आरक्षण वाढवुन दिले. त्याच पद्धतीने धनगर आणि मराठा समाज्याला ईडब्ल्यूएस प्रमाणे केंद्र सरकारने आरक्षण वाढवून द्यावे आसे मत कर्जत जामखेड चे आ. रोहित पवार यांनी चौंडी येथे बोलताना व्यक्त केले.
संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनु. जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने यशवंत सेनेचे राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले व महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांच्या सह कार्यकर्ते दोन दिवसापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव आसलेल्या चौंडी येथील स्मारकास्थळी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणस्थळी कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार यांनी चौंडी येथे जाऊन भेट घेतली व या धनगर समाजाच्या आरक्षण व इतर मागण्यांसाठी बसलेल्या उपोषण कर्त्यांना पाठींबा दिला.
धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी गेल्या आनेक वर्षापासूनची आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आसताना सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती येथे येऊन धनगर समाज्याला अश्वासन दिले होते की आमची सत्ता आल्यावर धनगर आरक्षणाचा मुद्दा पहील्या कॅबिनेट मध्ये घेऊ व आरक्षणाचा प्रश्र मार्गी लावु. भाजप सत्तेत येऊन पाच वर्षे झाली मात्र कुठल्याच कॅबिनेट मध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा घेतला नाही.
धनगर आरक्षणा प्रमाणे मराठा आरक्षणाचा मुद्दा देखिल तसाच आहे. गायकवाड आयोगाने कुठलाही आभ्यास नकरता प्रस्ताव द्यायचा म्हणून दिला होता. त्यामुळे सुप्रिम कोर्टाने जे काही मराठा समाज्याला आरक्षण मिळाले होते ते स्थगित केले. सध्या दोन्ही विषय पार्लमेंटमध्ये स्थगित आहेत. केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात जे आधिवेशन बोलवले आहे त्या मध्ये धनगर आणि मराठा समाज्यासाठी आरक्षण वाढवुन घ्यावे. मात्र त्यासाठी राज्य सरकारकडे धाडस लागते ते धाडस त्यांच्या मध्ये नाही. मात्र केंद्र सरकारने ईडब्ल्यूएस चा कोटा जसा वाढवला तसा कोटा मराठा व धनगर समाजाच्यासाठी वाढवुन दोन्ही समाज्याला न्याय द्यावा यासाठीच मी आज धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठींबा देण्यासाठी आलो आहे आसे देखील आ. रोहित पवार म्हणाले.
दि. 18 ते 22 सप्टेंबर 2023 या पाच दिवसाच्या संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर समाजाला अनु. जमाती मध्ये आरक्षण अमलबजावणी चा वटहुकुम काढला जावा व यासाठी महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा करावा. या मागणीसाठी आम्ही बी.के.कोकरे प्रणित यशवंत सेनेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी स्मारकास्थळी आमरण उपोषण सुरु केले आहे आशी माहिती यशवंत सेनेचे राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात, रमेश आजबे, मोहन पवार, राजेंद्र पवार, कुंडल राळेभात, आमर चाऊस, कीसनराव ढवळे, विश्वनाथ राऊत, प्रविण उगले, वसीम सय्यद, यांच्या सह आनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here