सौताडा येथिल रामेश्वर धबधब्यात पोहताना २३ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू

जामखेड प्रतिनिधी

सौताडा येथिल रामेश्वर धबधबा येथे पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला. सागर बाबासाहेब सातपुते, वय वर्ष 23, रा. साकेगाव तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर आसे मयत तरुणाचे नाव आहे.

जामखेड पासून दहा कीमी आंतरावर आसलेल्या पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र रामेश्वर येथील श्रावण महिन्यामध्ये यात्रा उत्सव सुरू असून येथे महाराष्ट्रभरातून अनेक ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी येत असतात. काल रविवार दि ३ सप्टेंबर रोजी दुपारी तीन च्या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथील काही युवक आपल्या मोटरसायकल वरुन सौताडा रामेश्वर येथे देवदर्शनासाठी आले होते.

देवदर्शन आटोपल्यानंतर त्यांनी धबधबा ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी जाऊन पाण्यामध्ये पोहण्यास सुरुवात केली पाण्यामध्ये पोहत असताना बरेच अंतरावरती गेल्यावरती माघारी येत असताना साकेगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील सागर बाबासाहेब सातपुते वय वर्ष 23 हा पाण्यामध्ये बुडाला त्याच्या मित्रांनी पाण्यामध्ये बराच वेळ शोध घेतला पण तो आढळून आला नाही त्यानंतर त्यांनी वन खात्यातील काही अधिकाऱ्यांना त्याची खबर दिली. वनाधिकारींनी पाटोदा पोलीस स्टेशन येथे खबर दिली यावेळी हेड कॉन्स्टेबल केशव रामदास तांदळे व मच्छिंद्र अण्णा भाऊ उबाळे यांनी ताबडतोब सौताडा रामेश्वर येथे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली लगेच त्यांनी पाण्यातील टाकण्याचा गळ आणला व त्यांनी मृतदेह पाहण्यास सुरुवात केली.

अवघ्या दहा मिनिटांमध्ये त्यांना मृतदेह गळाला लागला त्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईक व मित्रांसह पाटोदा येथे पोस्टमार्टम करण्यास पाठवला असून पोलीस स्टेशन पाटोदा येथे आकस्मित गुन्ह्याची नोंद झाली आहे यावेळी सौताडातील युवक प्रशांत घुले, आबासाहेब शिंदे, वन खात्याचे भाऊसाहेब पेचे, नवनाथ उबाळे, यादव साहेब व आधी गावकऱ्यांनी सहकार्य केले असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल केशव रामराव तांदळे मच्छिंद्र उबाळे हे पोलीस निरीक्षक पी आय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here