तालुक्यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा पुढील आंदोलन खर्डा चौकात करु -प्रा .मधुकर (आबा) राळेभात

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला असल्याने तातडीने दुष्काळ जाहीर करावा. शेतकर्‍यांना चारा उपलब्ध करून द्यावा, शेती आणि जनावरांना पिण्याची सोय करावी, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा ,लवकरात लवकर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढील आंदोलन हे खर्डा चौकात उतरुन रास्ता रोको आंदोलन करु असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा मधुकर राळेभात यांनी दिला आहे.

जामखेड तालुक्यामध्ये पावसाचा खंड पडल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पिके जळून गेली आहेत. तसेच पीकविमा ,जनावरांच्या चारा छावण्या व पाण्याचे टँकर सुरू करावेत यासह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी आज सोमवार दि ४ सप्टेंबर २०२३ रोजी शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यापुर्वी बीड कॉर्नर ते तहसील कार्यालयापर्यंत फेरी काढण्यात आली होती.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले की या सरकारला जाग यावी म्हणून हे शेतकऱ्यांचे आंदोलन केले आहे. भाजप व शिंदे सरकारला पक्षातले माणसं फोडण्यासाठी वेळ आहे मात्र दुष्काळ जाहीर करायला वेळ नाही. तालुक्यात शेतकर्‍यांच्या शेतीची लाईट टीकत नाही त्यामुळे दुष्काळातच पाणी नसल्याने पिके जळुन चालली आहेत. शासन आपल्या दारी आणि मग जनता झाली भिकारी आशी अवस्था सध्या या सरकारची झाली आहे .

शासनाने शासन आपल्या दारी च्या माध्यमातून कुठले काम केले ते सांगावे. एक रुपयात विमा काढुन कसला फायदा झाला शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने गावागावात टँकर सुरू करावेत. विहीरींचे पैसै घेण्याचे काम सध्या पंचायत समितीचे अधिकारी करत आहेत. शेतकर्‍यांन कडुन पैसै घेणे ही शासन आपल्या दारी स्कीम आहे का ? पंचायत समिती कार्यालयात अधिकारी टेबलाखालून पैसै घेतात त्या शिवाय शेतकर्‍यांची कामे होत नाहीत. असा आरोप यावेळी रमेश (दादा) आजबे यांनी केला आहे. आ. रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वरीष्ठ पातळीवर भेटी घेत आहेत याच अनुशंगाने आपण देखील निवेदन देण्यासाठी आलो आहोत.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड चे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा .मधुकर राळेभात, माजी सभापती सुर्यकांत मोरे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, रमेश (दादा)आजबे, नगरसेवक पवनराजे राळेभात, मोहन पवार, प्रकाश काळे, महेश राळेभात बापु कार्ले , डीगंबर चव्हाण, कुंडल राळेभात, नरेंद्र जाधव, भिमराव लेंडे , सरपंच बाळासाहेब खैरे, उमर कुरेशी, हर्षल डोके, हरीभाऊ आजबे, सिद्धेश्वर लटके , अमोल गिरमे, अमर चाऊस, उपसरपंच अनिल भोरे , रामहरी गोपाळघरे, प्रशांत राळेभात, वसीम सय्यद, श्रीकांत लोखंडे, स्वाभिमानी शेतकरी, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील लोंढे , काकासाहेब चव्हाण, सह अनेक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here