सुरक्षततेसाठी खर्डा येथिल महिला सरपंचाचे पोलीस बांधवांना राखी बांधून केले अनोखे रक्षाबंधन साजरे.

जामखेड प्रतिनिधी

हिंदू संस्कृतीतील भाऊ बहीणींसाठी महत्वाचा असलेल्या रक्षाबंधनादिवशी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर व सर्व पोलीस बांधवांना खर्डा येथिल महीला सरपंच सौ. संजीवनी वैजनाथ पाटील यांनी राखी बांधून खर्डा शहरातील महिला व नागरिकांच्या सुरक्षेचे साकडे घातले आहे.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील महिला सरपंच सौ. संजीवनी वैजनाथ पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या सरपंचपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर खर्डा शहराच्या विविध विकास कामांचे नियोजन केले असून कामे सुरूही केली आहेत. मात्र ग्रामपंचायत अंतर्गत नसलेला पण महत्वाचा असलेला नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दावर अगदी वेगळ्या पद्धतीने तोडगा काढण्यासाठी अनोखा उपाय शोधला असून काल झालेल्या हिंदू संस्कृतीतील भाऊ बहीणींसाठी महत्वाचा सण असलेल्या रक्षाबंधनादिवशी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर व सर्व पोलीस बांधवांना राखी बांधून खर्डा शहरातील महिला व नागरिकांच्या सुरक्षेचे साकडे घातले आहे. त्यास दुजोरा देत सपोनि महेश जानकर यांनीही संपुर्ण सुरक्षेची हमी घेत असल्याची ग्वाही देत सरपंच पाटील यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार केला आहे. या अनोख्या रक्षाबंधनाची काल दिवसभर चर्चा सुरू होती.

सौ. संजीवनी पाटील या सरपंच झाल्यानंतर काही विरोधांकडून त्यांना टार्गेट केले जात असून खर्डा शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वातावरण निर्माण केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच सरपंच यांचे पती व बाजार समिती संचालक वैजीनाथ पाटील यांच्यावर साक्ष देण्याच्या कारणावरून जामखेड न्यायालयाच्या आवारात त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ खर्डा ग्रामस्थांनी स्वयंपुर्तीने खर्डा शहर कडकडीत बंद ठेवले मात्र यालाही काही लोकांनी विरोध केला.

त्याच पार्श्वभूमीवर गावात यापुढे संपुर्णपणे शांतता नांदावी यासाठी सरपंच सौ. संजीवनी पाटील यांनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करत खर्डा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांना राखी बांधून साकडे घातले आहे.

यावेळी उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर , खर्डा गावच्या सरपंच सौ. संजीवनी पाटील, ग्रामसेवक प्रशांत सातपुते, बाजार समिती संचालक वैजिनाथ पाटील, पोलीस वारंट संपादिका श्वेता गायकवाड, पत्रकार दत्तराज पवार, धनसिंग साळुंखे, पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस कर्मचारी शेषराव म्हस्के, बाळू खाडे, अशोक बडे, हे मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here