जामखेड ते चिंचपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या खराब रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरवात
सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांच्या पत्राची घेतली दखल
जामखेड प्रतिनिधी
जामखेड ते चिंचपूर या राष्ट्रीय महामार्गास नीधी मंजुर होऊनही या ठीकाणचे काम सुरू झालेले नाही. परीणामी या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आसल्याने आपघातांनमध्ये वाढ झालेली आहे. या बाबत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत यासाठी जामखेड चे सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी लेखी पत्राद्वारे संबंधित ठेकेदार देशमुख कंस्ट्रक्शन यांच्याकडे मागणी केली होती. आखेर या मागणीची दखल घेत तातडीने देशमुख कंन्ट्रक्शन यांनी या महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरवात केली आहे.
गेल्या आनेक महीन्यांपासून नीधी उपलब्ध होऊनही संबंधित ठेकेदाराकडून जामखेड ते चिंचपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले नव्हते, गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे व धुळ आसल्याने आपघातांनमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. हा रस्ता म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. यामुळे सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी देशमुख कंस्ट्रक्शन, टेंभुर्णी व्यंकटेशराव चौधरी यांच्या कडे लेखी पत्राद्वारे तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यामुळे या पत्राची दखल घेत ताबडतोब देशमुख कंस्ट्रक्शन कडुन खड्डे बुजवण्यास सुरवात केली आहे.
जामखेड ते चिंचपूर हा रस्ता अंत्यत खराब झाला आहे. मोठ मोठी खड्डे चुकवताना अपघात घडत आहेत. अनेकांचा जीव गेला आहे. तर शेकडो लोकांना कायमचे अपंगत्व आले आहेत. त्यामुळे ताबडतोब रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी केली होती. आखेर रमेश आजबे यांच्या पत्राची दखल घेत खड्डे बुजवण्यास सुरवात झाली आहे. यामुळे वाहनधारकांनी सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांचे आभार मानले आहेत.