शेतीपंपाचा विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकरी आक्रमक, विज पुरवठा सुरळीत करण्याची केली मागणी

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील जमदारवाडी, जगदाळे वस्ती, भुतवडा येथील शेतकऱ्याच्या शेतीपंपाचा विज पुरवठा विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक होत महावितरण कार्यालयात येऊन उपकार्यकारी अभियंता जाब विचारूण निवेदन दिले. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित आसलेले स्वाभाविक शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेशदादा आजबे यांनी शेतीपंपाचा विज पुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

सध्या जामखेड तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातच खरीप पिके जळुन चालली आहेत. उर्वरित पिकांसाठी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची आवश्यकता आसताना महावितरणकडून शेतीपंपाचा विज पुरवठा विस्कळीत झाला आहे.

जामखेड तालुक्यातील जमदारवाडी भुतवडा, जगदाळे वस्ती, लेहनेवाडी या गावातील शेतकरी आज गुरुवार दि. ३१ रोजी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेशदादा आजबे यांच्या समवेत जामखेड महावितरण कार्यालयात शेतीपंपाच्या विस्कळीत झालेल्या विज पुरवठ्याबाबत विचारना करण्यासाठी आले होते. या वेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस. एस. चेचर यांच्याशी चर्चा करताना शेतकर्‍यांनी सांगितले की राजुरी भुतवडा व पाडळी या शेतीपंपाच्या वाहिनीवर समसमान विज पुरवठा करावा, राजुरी वाहिनीवर जास्त प्रमाणात लोड आसल्याने वारंवार विज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे त्या वाहिनीचे दोन भाग करून पुर्ण दाबाने वीजपुरवठा करण्यात यावा तसेच वीजपुरवठ्याबाबत माहिती विचारण्यासाठी शेतकरी महावितरण कार्यालयातील दुरध्वनीवर फोन करतात मात्र तेथील कर्मचारी शेतकऱ्यांना प्रतिसाद देत नाहीत ही बाब उपअभियंता चेचर यांच्या निदर्शनास आणून दिली आसता त्यांनी कर्मचार्‍यांना समज दिली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना एस. एस. चेचर यांनी सांगितले की विजेच्या मागणी व पुरवठ्याबाबत तफावत आल्यास तातडीचे लोडशेडिंगचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात येत आसतात वेळोवेळी योग्य त्या ग्रुपसाठी शेतीपंप व गावठाण वाहिनीसाठी आदेश प्राप्त होत आसल्याने लोडशेडिंग करावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या आलेल्या निवेदनातील मागण्या वरीष्ठ कार्यालयाकडे कळवु व विजपुरवठा सुरळीत करू आसे अश्वासन दिले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेशदादा आजबे, सुंदरदास बिरंगळ, ज्ञानेश्वर कदम, वाल्मिक जगदाळे, पांडुरंग कदम, रमेश नेटके, पवन आजबे, ज्ञानदेव कोल्हे, शुभम आजबे, दिपक जगदाळे, अशोक नेटके, अक्षय जगदाळे, सागर आजबे, छगन आजबे, ऋषीकेश जगदाळे, रामनाथ जगदाळे, अशोक राळेभात, ऋषिकेश कदम, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here