रोखठोक जामखेड…..
शहरातील तपनेश्वर रोड वरील मटका बुकी करणाऱ्या तसेच बाजारतळ व भुतवडारोड येथील पानटपऱ्यावर मवा बनवुन विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून गुन्हे दाखल केले. त्यामुळे स्थानिक शहरातील पानटपऱ्यावर खुले आम मावा विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी अहमदनगर च्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला जामखेड शहरात मावा विक्री करत आसल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवार दि २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शहरातील तपनेश्वर रोड वर आसलेल्या एका हॉटेल जवळ मटका बुकी करणाऱ्या आरोपी रज्जाक बशिर पठाण रा. जामखेड हा आडोशाला लोकांकडून पैसै घेऊन कल्याण नावाचा मटका हार जीतीचा खेळ खेळताना व खेळवत असताना अढळुन आला. त्या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी मटक्याचे साहीत्य व रोख रक्कम असा एकुण १३८० रुपये जप्त केले. पो. कॉ. प्रकाश गणपत वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दुसर्या ठिकाणी याच दिवशी शहरातील बाजारतळ येथील सागर पान सेंटर व भुतवडारोड येथील पान सेंटर या ठिकाणी आरोपी बंटी उर्फ सचिन सोपान डीसले रा. संताजी नगर, जामखेड हा चोरुन लपुन महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या गुटखा तसेच हाताच्या सहय्याने मावा तयार करुन विक्री करत आसताना अढळुन आला. त्याच्या कडे झाडाझडती घेतली आसता टपरीच्या आत मध्ये मावा बनवण्याचे साहीत्य असा एकूण १२ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पो. कॉ रणजित जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपी विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी नगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके व जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ .भाऊसाहेब मुरलीधर कुरूंद, रणजित जाधव ,संभाजी कोतकर व जामखेड पोलीस स्टेशन चे पो. कॉ शिवाजी भोस यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चौकट
शहरातील पानविक्री च्या नावाखाली
टपऱ्यांवर गुटखा व मावा विक्री
पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी अवैध धंद्यांविरोधात तालुक्यात कडक पावले उचलली आसली तरी शहरातील बस स्टँड, बाजारतळ, बीड रोड, खर्डा चौक, खर्डा रोड व जयहिंद चौक अशा ठिकाणी पानविक्री च्या नावाखाली सुरू आसलेल्या अनेक पानटपऱ्यांवर गुटका व मावा विक्री होत आहे. याठिकाणी देखील स्थानिक पोलीसांनी छापे टाकून कारवाई केली पाहिजे असे देखिल मागणी नागरिकांकडुन होत आहे.
Hi,
I thought you’d like to know that customers are struggling to find your website due to several website errors.
We at Rankkkings are providing a Free SEO Audit so you can know how can you optimize your website.
Also Get SEO Services at Minimal Prices:
Hands-on complete and expert management of all of search engine optimisation efforts, including
✔Audit, finding opportunities and issues
✔Hand-written, proof-read articles for your blog
✔Keywords research using SEMRush ranking data
✔Latest technical optimisation of your pages
✔Client’s support and availability
✔Updates and reporting on ranking
And many more Services
For quick call – https://bit.ly/lets-discuss-now
Also get 5 Bussiness Emails free from us in good faith – Saves $25 per month
Contact : info@rankkking.com
Thanks & Regards
Petric
Great article. Articles that have significant and informative content are more enjoyable.