रोखठोक जामखेड

ब्रिटिश कालीन आसलेल्या महाराष्ट्रातील पोलीसांची घरे मोडकळीस आली आहेत. मात्र येणाऱ्या अर्थ संकल्पात पोलिसांच्या निवासस्थाना साठी बजेट मध्ये पावणेचारशे कोटी रुपये टाकणार आहोत अशी घोषणा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या जामखेड पोलीस वसाहतीचे भुमीपुजन आज दि. ४ रोजी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत दुपारी मोठ्या संपन्न झाले या वेळी देसाई बोलत होते.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अधिक्षक अभियंता दिपाली भाईक, उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, ठेकेदार हर्षद सारडा, आर्किटेक्ट जयंत कोलते, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड तालुका प्रमुख संजय काशीद, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्तात्रय वारे, मधुकर राळेभात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख मंगेश आजबे, नगराध्यक्ष निखिल घायतडक, कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष शहाजी राजेभोसले, सरचिटणीस राजेंद्र कोठारी, सुर्यकांत मोरे, नगरसेवक डीगंबर चव्हाण पवन राळेभात, युवा नेते रमेश आजबे, प्रा लक्ष्मण ढेपे, सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कर्जत व जामखेड शहरातील पोलीस वसाहतीसाठी एकुण साडे पंधरा कोटी रुपये मंजूर केले आहेत. ७६ अधिकारी पोलीस यांच्या साठी ही निवास स्थाने बांधण्यात येणार आहेत. कोरोना काळात मी राज्यातील १४ जिल्ह्यात दैरा केला या मध्ये मला महसूल कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांनी कोरोना काळात चांगली कामगिरी केली. विषेश म्हणजे महीला पोलीसांची देखील भुमिका महत्त्वाची होती. सलग १८ तास पोलीसांनी काम केले. महीला व मुलींन च्या छेडछाडीला आळा घालण्यासाठी व वाढत्या गुन्हेगारीवर रोख लावण्यासाठी कर्जत जामखेड शहरात सी सी टी व्ही कॉमेरे बसवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. येणाऱ्या अधिवेशनात हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे अशी घोषणा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी जामखेड येथे केली.आमदार रोहित पवार यांच्या मध्ये कामाबाबत खुप जिद्द व चिकाटी आहे. त्यांनी कर्जत जामखेड च्या पोलीस वसाहतीचा सर्वात आधी प्रस्ताव सादर केला. त्यामुळेच त्यांच्या मतदारसंघात सर्वात प्रथम पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लागला असे ते म्हणाले.

आमदार रोहित पवार यांनी बोलताना सांगितले की पोलीस वसाहतीसाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शन लाभले आहे. खर्डा येथील पोलीस स्टेशन चा प्रस्ताव तयार आहे त्यास देखील आठ दहा दिवसात मंजुरी मिळणार आहे. तसेच कुसडगाव येथील भारत बटालियन ट्रेनिंग सेंटर चे देखील भुमीपुजन करण्यात येणार आहे. पोलीस भरती मध्ये सर्वात प्रथम कर्जत व जामखेड मधिल तरुणांना प्राधान्य देण्यात येईल. शहरात ट्राफिक ची समस्या सोडविण्यासाठी देखील पोलीसांनी चांगली कामगिरी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here