महावितरणचा गलथान कारभार; विजेच्या तारेला ट्रकचा स्पर्श झाल्याने खर्डा येथे ट्रक चालकाचा जागीच मृत्यू.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील शिर्डी हैदराबाद राज्य महामार्गावरील खर्डा येथील सिताराम गड येथे राम मच्छिंद्र निंबाळकर वय ४० वर्ष राहणार दुरगाव ता. कर्जत येथील ट्रक चालकाचा कमी उंचीवरील विद्युत प्रवाहला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. यामुळे महावितरणचा गलथान कारभार समोर आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की सीताराम गडाच्या मागील बाजूला गडाचे बांधकाम चालू आहे व ट्रक त्या रस्त्याला जात असतानाच ३३ के. व्ही. च्या तारेला ट्रकचा स्पर्श होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दि ५ नोव्हेंबर २०२४ रोजी जामखेड तालुक्यातील सीताराम गड परिसरात घडली आहे. मयत राम मच्छिंद्र निंबाळकर (वय ४०) राहणार दुरगाव तालुका कर्जत असे मृत चालकाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार मृत यवूक राम मच्छिंद्र निंबाळकर ट्रक नंबर (एम एच १२ के.आर. २७५१) या ट्रक मध्ये कर्जत तालुक्यातील दुरगाव येथून विटा भरून खर्डा येथील सीताराम गड येथे जात असताना हाय टेन्शन इलेक्ट्रॉनिक तारेला स्पर्श होऊन , हाय टेन्शन तार खूप उंचीवर नसल्याने ट्रकमध्ये तारेचा करंट उतरून ट्रकचे मागील दोन टायर फुटून मयत झाला आहे .या ट्रकमध्ये विटा भरून जात असताना वरून गेलेल्या ३३ के. व्ही. च्या विजेच्या तारेला ट्रकचा वायरला स्पर्श होताच ट्रकचे टायर फुटले, टायर फुटल्याच्या आवाजाने नागरिकांनी ट्रककडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत मयत राम मच्छिंद्र निंबाळकर यांचा मृत्यू झाला होता.










