धक्कादायक! धारदार चाकूने पोलिस पत्नी व मुलीची हत्या करून पतीने घेतला गळफास
चिखली शहरात ऐन नागपंचमीच्या दिवशीच हत्याकांड घडल्याने संपूर्ण शहरात खळबळ
बुलढाणा प्रतिनिधी, मोहन चौकेकर
चिखली पोलीस स्टेशन येथे रात्रपाळी कर्तव्य बजावुन आलेल्या पत्नीला सकाळी ९ वाजता घरी घेऊन आल्यावर पती व पत्नी मध्ये झालेल्या जोरदार वादामुळे रागारागात पतीने घरामध्ये असलेल्या धारदार चाकुने पत्नीसह चिमुकलीवर अनेक वार करुन हत्या केल्याची घटना पंचमुखी महादेव मंदिरा जवळील शाहु नगर मधे दि.२१ ऑगस्ट च्या सकाळी १० वाजता घडली. पत्नी व मुलीची हत्या केल्यानंतर पती किशोर कुटे याने देखील कवठळ येथील गांगलगाव मार्गावर विहिरी मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

सविस्तर माहितीनुसार वृत्त्त असे की, चिखली येथील महिला पोलीस कर्मचारी वर्षा किशोर कुटे(दंदाले) वय ३७ ह्या चिखली पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावत होत्या. सकाळी ड्युटी संपल्यावर पती किशोर कुटे त्यांना सकाळी साडेनऊ वाजता घरी घेऊन आला. त्यानंतर त्यांच्या मध्ये वाद झाल्याचे समोर आले. याच वादातुन त्याने पत्नीवर धारदार चाकुने वार केले. यामध्ये पत्नीच्या हतावर वार अडवल्याने मोठ्या प्रमाणवर जखमा आढळुन आल्या, घरी असलेली दोन वर्षाची कृष्णाली देखील घरीच होती तिच्या देखील पोटावर वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

हे हत्याकांड घडविल्या नंतर पती किशोर जनार्दन कुटे याने घरुन दुचाकी क्रमांक एम.एच डब्ल्यू ९९७२ स्कुटी ने जाऊन कवठळ शिवारातील गांगलगाव रस्त्यावर असलेल्या विहिरीत दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. सदर घटना तोपर्यंत उघडकीस आली नव्हती विहिरीत आत्महत्या केलेल्या व्यक्ती किशोर कुटे असल्याची ओळख त्याच्या साल्लाला पटली सदर बातमी आपल्या बहिणीला सांगण्यासाठी चिखली येथील एका महिला कर्मचारी यांना सोबत घेऊन मयत महिला पोलिस वर्षा कुटे यांच्या निवासस्थानी आल्यावर त्यांना वर्षा कुटे (३७ वर्ष) व कु. कृष्णाली कुटे (२ वर्ष) रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. या दोघीची गळा चिरून हत्या केल्याचे दिसून येत होते.
याबाबत त्यांनी तात्काळ चिखली पोलिसांना कळवल्यावर एकच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी यापती पत्नीस सकाळी १० वाजता ड्युटी संपुन घरी जातांना बघितले होते. त्यानंतर किशोर कुटे मोठी मुलगी चवीला शाळेमध्ये सोडुन घरी आला . त्यानंतर पती व पत्नी काही तरी कारणाने जोरदार भांडण झाल्याने रागारागात हे हत्याकांड घडले. सुदैवाने मोठी मुलगी ओवी शाळेत गेली असल्याने ती या घटनेमधुन मधुन वाचली अशी संपूर्ण चिखली शहरात चर्चा आहे. तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. अधिक तपास चिखली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here