कोळगावथडी घटनेचा जामखेड मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध, तहसीलदार यांना दिले निवेदन 

जामखेड प्रतिनिधी.

काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी या गावातील मशिदीमध्ये ठेवलेल्या पवित्र ग्रंथाची काही विघ्नसंतोषींकडुन तोडफोड करून विटंबना केल्याची दुःखद घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ जामखेड मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले आहे.


काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी या गावातील मशिदीमध्ये ठेवलेल्या पवित्र ग्रंथाची काही विघ्नसंतोषींकडुन तोडफोड करून विटंबना केल्याची दुःखद घटना घडली आहे. इस्लाम धर्मामध्ये मुस्लिम समाजाची फार मोठी श्रद्धा कुराण या पवित्र ग्रंथावर आहे. त्या ग्रंथाची विटंबना झाल्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेलेले आहेत.

असे असताना सुद्धा मुस्लिम समाजाने फार सामंजस्य दाखवून शांततेचे धोरण स्वीकारले. कोणताही मोठा मोर्चा न काढता ठराविक लोकांनी शांततेत जाऊन सदर घटनेचा निषेध म्हणून जामखेड मुस्लिम समाजाच्या वतीने तहसिलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.

सदर प्रकार हा भारतीय दंडविधान कलम २९५, १५३ क, मध्ये येत असून धर्माधर्मात भेदभाव पसरवणे, अशांतता निर्माण करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस प्रशासन देखील आपापल्या परीने अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करत असतांना देखील काही समाजकंटक लोक जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. तरी या सर्व घटनेचा सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच यापुढे असे प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.

जामखेड मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार चंद्रे यांना निवेदन देण्यात आले यावेळी जामखेड वकील संघाचे तालूकाध्यक्ष अँड अब्दुल (शमा) कादर शेख, मुस्लिम पंचकमिटीचे अध्यक्ष अझरुद्दीन काझी, शेरखान पठाण, मौलाना खलील, मौलाना रिजवान शेख, मूफ्ती अजवद शेख, अँड जैद सय्यद, अँड आसिफ पटेल, अँड शकील शहा, अँड कादीर, नगरसेवक शामीर सय्यद, शाकीर खान, ताहेरखान पठाण, जमीर सय्यद, मुख्तार सय्यद, इम्रान शेख, वसीम बिल्डर, जूबेर शेख शाकीर पठाण एजाज शेख, सोमू शेख, मूश्ताक शेख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here