रत्नदीप संस्थेस एम.फार्मसी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजुरी, रत्नदीप शैक्षणिक संकुलात नव्या अभ्यासक्रमाचा समावेश
जामखेड प्रतिनिधी
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेस एम. फार्मसी हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पाच विषयांत सुरू करण्यास फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली व तंत्र व उच्च शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांनी शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून सुरू करण्यास मंजुरी दिली असुन त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांनी दिली आहे.
व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून नोकरी व उद्योग क्षेत्रातील शाश्वत संधीमुळे विद्यार्थी व पालक यांचा व्यावसायिक शिक्षणाकडे वाढता कल पाहता रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलात आयुर्वेद,होमिओपॅथी,फार्मसी व नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून विविध व्यावसायिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.जामखेड-कर्जत रोड लगत जामखेड शहरापासून दोन किमी अंतरावर वीस एकर जमिन क्षेत्रावर दिल्ली येथिल नामांकित आर्किटेक्चर यांनी डिझाईन केलेल्या सुसज्ज व आत्याधुनिक भव्य अशा सर्व सोयी सुविधांनी युक्त इमारतीत राज्याच्या विविध जिल्ह्यातील दीड हजार विद्यार्थी-विद्यार्थीनी विविध अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत.
रत्नदीप शैक्षणिक संकुलातील (बीएएमएस) रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या महाविद्यालयाचा 3133 हा सांकेतिक क्रमांक असुन (बीएचएमएस) रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या कॉलेजचा 4151 हा सांकेतिक क्रमांक आहे. तसेच (बी.एस्सी) रत्नदीप नर्सिंग कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर चा 9140 हा सांकेतिक क्रमांक आहे.
संस्थेमार्फत एएनएम व जीएनएम हे नर्सिंग पदविका अभ्यासक्रम देखिल सुरू करण्यात आलेले असुन त्यांची प्रवेश प्रक्रिया कॉलेज स्तरावर राबविण्यात येते. (पदविका,पदवी व पदव्युत्तर फार्मसी) रत्नदीप फार्मसी कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगरचा सांकेतिक क्रमांक 5465 व 5489 हे आहेत. शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत चालु शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती प्रवेश समन्वयक रविंद्र ढवळे व प्रशांत राळेभात यांनी दिली आहे.
……………………………………
चौकट
जागतिक स्तरावर फार्मसी क्षेत्रात असलेल्या संधी पाहता जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांचा फार्मसी कडे कल वाढतो आहे. रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलात एम. फार्मसी हा अभ्यासक्रम सुरू होत असल्याने त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थी-विद्यार्थीनींना फायदा होणार आहे.
डॉ. सुग्रिव घोडके
प्राचार्य,रत्नदीप फार्मसी कॉलेज रत्नापूर, तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर.
……………………………………
चौकट
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलात एम फार्मसी अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी मिळाल्याने परीसरातील विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
डॉ. संजय पोपळे
प्राचार्य,रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी रत्नापूर
तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here