रोखठोक जामखेड….
दुर्धर आणि जुनाट आजार आसलेल्या रुग्णांसाठी सामाजिक कार्यकर्ते व सावळेश्वर ग्रृप चे संचालक रमेश आजबे यांनी नुकतेच प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉ स्वागत तोडकर यांचे महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात तब्बल २७०० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
सावळेश्वर ग्रृप चे संचालक व सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी शनिवार दिनांक २३ जानेवारी या दिवशी महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉ. स्वागत तोडकर यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती सभापती सौ राजश्री सूर्यकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. जामखेड मध्ये प्रथमच झालेल्या या कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळाला. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत झालेल्या तपासणी शिबिरात २७०० रुग्णांनी लाभ घेतला.
या वेळी माजी सभापती प्रा संजय वराट, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे संचालक राजेश मोरे, प्राचार्य दिपक होशिंग, राष्ट्रवादी चे युवा नेते शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, इन्नुसभाई सय्यद, संजय बेरड, दादासाहेब ढवळे, सागर कोल्हे, चंद्रकांत आजबे, व्यापारी विजय कोठारी, घनशाम अडाले, विठ्ठल शेळके, भगवान गायकवाड, लिंमकर टेलर्स सह सावळेश्वर ग्रृप चे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सायंकाळी डॉ स्वागत तोडकर यांचे व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमाला आमदार रोहितदादा पवार यांच्या मातोश्री सौ. सुनंदा ताई पवार उपस्थित होत्या.