रोखठोक जामखेड….
गेल्या अनेक महिन्यांपासून वाट बघत आसलेली कोरोना लस ही जामखेड ग्रामीण रुग्णालय दाखल झाली आहे. जामखेड मध्ये आरोग्य सेविका ज्योती पवार ह्या पहील्या लसीच्या मानकरी ठरल्या आहेत. तालुक्यातील एकुण ७९९ आरोग्य कर्मचारी, खाजगी डॉक्टर व अंगणवाडी सेविका यांनी आपली नोंदणी केली आहे.
जामखेड शहरामध्ये कोविड १९ लस( ७९९ )लोकांसाठी आली असून लस देण्याची सुरुवात जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आली आहे आठ ते दहा महिन्यापासून कोरोना ने संपुर्ण जग हैराण झाले होते तो कोरोना अजूनही समाजात ठाण मांडून बसला आहे मात्र आता घाबरायचं कारण नाही कारण कोरोणा ची लस बाजारात आली आहे जामखेड मध्ये सुध्दा दाखल झाली आहे तसेच जामखेड तालुक्यातील कोरोना ने मोठे थैमान घातले होते अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. आता जामखेड करांसाठी एक खूषखबर म्हणजे कोरोणा लस आपल्या जामखेड ग्रामीण रुग्णालयात आली आहे. लस देण्याचा पहिला मान जामखेड ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेविका ज्योती पवार यांना देण्यात आला आहे.
यावेळी जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे ,वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील बोराडे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, बी.डी.ओ. कोकणी साहेब, डॉ.कुंडलीक अवसरे, डॉक्टर असोशियन चे अध्यक्ष डॉक्टर भरत देवकर, डॉ. शिंदे, डॉ. हांगे, डॉ. प्रविण मंडलेचा, श्याम जाधवर, अधिपरिचारिका सातपुते, माळी आदी उपस्थित होते.
सध्या ७९९ वैद्यकीय क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय (फ्रंटलाईन) कर्मचारी यांना ही लस देण्यात येणार आहे. अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय वाघ यांनी दिली. लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला असून आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आलं आहे. पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटात फ्रंटलाईन वर्करचा समावेश असून त्यामध्ये राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधील कर्मचाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांचा आणि नगरपालिका व महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या गटात ५० वर्षावरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत अशा ५० वर्षाखालील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.