ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठा अधिकारी झाला पाहिजे-प्रकाश पोळ

जामखेड येथे स्कॉलरशिप व नवोदयसाठी स्पर्धा परीक्षा कार्यशाळा संपन्न

जामखेड प्रतिनिधी

ग्रामीण भागातल्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा शाळेत आला पाहिजे, तो शिकला पाहिजे. भविष्यात त्याने मोठे होऊन स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवुन मोठा अधिकारी झाला पाहिजे त्यासाठी इयत्ता 5 वी ची स्कॉलरशिप व नवोदय परीक्षा महत्त्वाची आहे. भविष्याचा तो मजबूत पाया असून तो पाया आणखी मजबूत करण्याचे आवाहन उपस्थित सर्व शिक्षकांना गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले.

जामखेड येथिल ल. ना. होशिंग विद्यालयात दि 15 जुलै 2023 रोजी ल.ना.होशींग विद्यालय जामखेड येथे तालुक्यातील इयत्ता पाचवीच्या व इयत्ता आठवीच्या वर्ग शिक्षकांसाठी स्कॉलरशिप परीक्षा व नवोदय परीक्षा संदर्भात विशेष कार्यशाळेचे आयोजन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.

या कार्यशाळेमध्ये कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मार्गदर्शन करताना प्रकाश पोळ यांनी उपस्थित सर्व 5 वी व 8 वी च्या वर्ग शिक्षकांना तसेच स्कॉलरशिप शिकवणाऱ्या विषय शिक्षकांना आवश्यक ते मार्गदर्शन केले.

पुढे बोलताना पोळ साहेब म्हणाले की मी जामखेड पंचायत समितीमध्ये आल्यापासून तालुकास्तरावरील शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न यांचे वेळोवेळी कॅम्प लावून त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम केले आहे. भविष्यात सुद्धा तालुकास्तरावरील सर्व प्रश्न सोडवण्यात येतील. पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या ज्या भौतिक सुविधा देता येणे शक्य आहे. त्या सुविधा शक्य तेवढ्या शाळांना देण्यास आम्ही निश्चित प्रयत्न करू. तुमचे वैयक्तिक कुठलेही प्रश्न तालुकास्तरावर प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता आम्ही घेऊ , परंतु जामखेड तालुक्यातील सर्व शाळांची गुणवत्ता वाढविण्याचे काम तुम्ही सर्व शिक्षकांनी जोमाने करावे. तुमच्या सर्व शिक्षकांच्या पाठीशी मी कुटुंबप्रमुख म्हणून नेहमी उभा असेल. तुम्हा सर्वांच्या चांगल्या कामाचे निश्चित भविष्यात कौतुक होईल…& तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आपला जामखेड तालुका गुणवत्तेच्या बाबतीत येत्या काळामध्ये सर्वात पुढे असेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली…

तालुक्यातील दरवर्षीच्या स्कॉलरशिप तथा नवोदय परीक्षेमध्ये भरघोस यश मिळवणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लटकेवस्ती, दत्तवाडी, पिंपरखेड या शाळेतील शिक्षकांनी सुद्धा उपस्थित वर्ग शिक्षक व विषय शिक्षक यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये अनिता पवार मॅडम माळीवस्ती शाळा, रसिका गाढवे मॅडम लटकेवस्ती शाळा, मनोहर इनामदार बांधखडक शाळा भगवान साळुंखे सर पिंपरखेड शाळा या शाळेतील शिक्षकांनी मार्गदर्शन करताना स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जर यश मिळवायचे असेल तर मुलांचा ज्ञानाचा पाया मजबूत असणे आवश्यक आहे. मिळवलेल्या ज्ञानाचे आकलन होऊन त्याचे उपयोजन करणे महत्त्वाचे आहे. तसेच सगळ्यात महत्त्वाचे सराव व सातत्य असणे गरजेचे आहे. तर स्कॉलरशिप व नवोदय परीक्षेमध्ये हमखास यश मिळवता येते.

स्कॉलरशिप व नवोदय परीक्षेच्या मार्गदर्शनानंतर नुकतेच तालुक्यात बदलून आलेले आदर्श व उपक्रमशील शिक्षक लहू बोराटे सर यांनी शाळेचा विकास लोकसहभागाच्या माध्यमातून कसा करावा, लोकांचा सहभाग कसा गोळा करावा, त्यासाठी आपण काय केले पाहिजे ? तर शाळेचा भौतिकदृष्ट्या सर्व गुणसंपन्न विकास होऊ शकेल. यावर उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले.

यावेळी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री.गणपत चव्हाण सर, प्राचार्य श्री.श्रीकांत होशिंग सर, सर्व केंद्रप्रमुख श्री.संतोष राऊत सर संजय घोडके सर ,राम निकम सर, सुरेश मोहिते सर, मल्हारी पारखे सर,बाबासाहेब कुमटकर सर, केशव गायकवाड सर,रामदास गंभीरे सर,संतोष पांढरे सर व व तालुक्यातील विविध शाळातील इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गाचे सर्व वर्ग शिक्षक विषय शिक्षक उपस्थित होते.

या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप व नवोदय परीक्षेच्या माध्यमातून ज्यादा तास घेऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. याचा फायदा निश्चित ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या सर्व मुलांना होईल. त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडून स्पर्धा परीक्षेची तयारी तसेच त्याची आवड त्यांना या बालवयात निर्माण होऊन त्यांचे भविष्य उज्वल होण्यास मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here