आमदार रोहित पवार यांच्या पुण्यातील सृजन हाऊस, हडपसर या कार्यालयावर अज्ञातांनी केला हल्ला.

वहानांची देखील केली जाळपोळ

पुणे प्रतिनिधी : आमदार रोहित पवार यांच्या पुण्यातील सृजन हाऊस, हडपसर या कार्यालयावर पांढर्‍या रंगाच्या चारचाकीमध्ये दोन ते तीन जणांनी येऊन हल्ला केला. कार्यालयाच्या खाली असलेल्या काही वस्तूंचे व वाहनाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी आ. रोहित पवार यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती आशी की आ. रोहित पवार यांचे सर्व कार्यालयीन कामकाज पुणे येथील हडपसर भागातील या कार्यालयात चालते. तसेच लोकांच्या आडीआडची सोडवण्यासाठी आ. रोहित पवार हे या ठीकाणी लोकांशी संवाध साधत आसतात. तसेच जनसंपर्क कार्यालय म्हणून देखील या सृजन हाऊस ची ओळख आहे. सामाजिक काम आसो कींवा राजकीय काम याच सृजन हाऊस मधुन केले जाते.

याच सृजन हाऊस वर २-३ अज्ञात लोकांनी शनिवारी पांढऱ्या रंगाच्या चारचाकीमध्ये येऊन मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास हल्ला केला व कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसून कार्यालयात खाली असलेल्या काही वस्तूंचे खाली उभे असलेल्या वाहनाचे नुकसान झाले आहे. या संदर्भात स्वतः आमदार रोहित दादा पवार यांनी तक्रार दाखल केली असून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळच असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस गुन्हेगारांचा तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here