बंड करणार्‍या नेते व आमदारांच्या विरोधात जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कडुन निषेध

जामखेड प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि समर्थक आमदारांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा मोठा निर्णय घेतला याच निषेधार्थ जामखेड मध्ये जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे सांगितले.

राज्याच्या राजकारणात काल मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि समर्थक आमदारांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा मोठा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर छगन भुजबळ यांच्या सह ८ आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आसल्याने सध्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांन मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि समर्थक आमदारांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ दि ३ जुलै रोजी सकाळी जामखेड मध्ये आकरा वाजता जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील खर्डा चौक या ठीकाणी निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले की राष्ट्रवादीला खिंडार पाडणाऱ्या कालच्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत . तसेच संपूर्ण जामखेड तालुका शरद पवार यांच्या बरोबर असल्याचे जाहीर केले.


भाजपा सरकार शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या विरोधात आहे त्यामुळे पवार साहेबांनी त्यांच्या विरोधात एकजूट करण्याचा प्रयत्न केला तर भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. या देशात स्व-कर्तृत्ववाने मोठे झालेले बाबासाहेब ठाकरे व शरदचंद्र पवार हे नेते आहेत त्यांनी कधीही आपल्या तत्वाला मुरड घातली नाही. संपूर्ण जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे शरदचंद्र पवार यांच्या बरोबर आहेत असे सांगितले.

या वेळी कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर (आबा) राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी सभापती सुर्यकांत (नाना) मोरे, सुरेश भोसले, राजेंद्र पवार, प्रकाश सदाफुले, उमर कुरेशी, निखिल घायतडक, ईस्माईल सय्यद, अमित जाधव, वसीम सय्यद, वैजीनाथ पोले, प्रकाश काळे, राजेंद्र गोरे, चाँद तांबोळी, बजरंग डुचे, डिगा चव्हाण, पवनराजे राळेभात, राजेंद्र पवार, जुबेर शेख, शहाजी राळेभात,सरपंच बाळासाहेब खैरे, राहुल आहेर, कुंडल राळेभात, काकासाहेब कोल्हे, काकासाहेब चव्हाण, नरेंद्र जाधव, प्रशांत हिरवे, बापु साहेब शिंदे, बंडु राळेभात सह आनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here