

शेतातुन गुरे घेऊन गेल्याने गळ्यावर कुर्हाडीने घाव घालुन केला खुन,चार जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल
जामखेड : शेतातुन गुरे घेऊन जाण्याच्या कारणावरून तालुक्यातील मोहरी गावात झालेल्या भांडणात पुतण्याने चुलत्याच्या गळ्यावर कुर्हाडीने घाव घालुन खुन केला. या प्रकरणी एकुण चार जणांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आसुन दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

अशोक धोंडीबा हळणावर वय ५३ वर्षे रा. मोहरी. ता. जामखेड यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या बाबत पोलिसांन कडुन मिळालेली माहिती अशी की आज सोमवार दि ३ जुलै २०२३ रोजी जामखेड तालुक्यातील मोहरी या गावातील हाळणावर वस्ती येथिल मयत आशोक धोंडीबा हाळणावर हे सकाळी साडेअकरा वाजता आपली जनावरे चारण्यासाठी वस्ती वरुन तेलंगशी फटा या ठीकाणी चालले होते. यावेळी फीर्यादी चा चुलत भाऊ युवराज बाबासाहेब हळणावर याने मयत आशोक धोंडींबा हाळणावर यांना सांगितले की तुम्ही शेतातुन गुरे घेऊन जाऊ नका आसे सांगितले त्यावर मयत आशोक हळणावर यांनी सांगितले की आजुन जमीनीचे वाटप झाले नाही हे सामाईक क्षेत्र आहे. याचाच राग आरोपी युवराज बाबासाहेब हळणावर याला आला व त्याने घरी जाऊन कुर्हाड घेऊन आला व घरातील कुर्हाडीने मयताच्या गळ्यावर व मानेवर दोन तीन वार करुन गंभीर जखमी केले. तर इतर आरोपी दत्तात्रय बाबासाहेब हळणावर, नवनाथ सिताराम हळणावर व आप्पा नवनाथ हाळणावर सर्व रा. हाळणावर वस्ती, मोहरी ता. जामखेड यांनी मारहाण केली व सर्वजण घटनास्थळाहुन पळुन गेले.

या हल्ल्यात अशोक हळणावर गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने खर्डा येथिल खाजगी हॉस्पिटलला आणण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठवले यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तपासुन त्यांना मयत घोषीत केले.

या प्रकरणी मयताचा मुलगा आनंद आशोक हळणावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी युवराज बाबासाहेब हळणावर, दत्तात्रय बाबासाहेब हळणावर, नवनाथ सिताराम हळणावर व आप्पा नवनाथ हाळणावर सर्व रा. हाळणावर वस्ती,मोहरी ता.जामखेड आशा चार जणांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, सपोनि महेश जानकर पो. ना. संभाजी शेंडे, पो. कॉ. वैजीनाथ मिसाळ, शशिकांत म्हस्के, आशोक बडे व बाळु खाडे यांनी भेट दिली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सपोनि महेश जानकर हे करत आहेत.






