रोखठोक जामखेड ….
तालुक्यात कोरोनाचे संकट उभे ठाकले आसतानाच आता जामखेड तालुक्यात बर्ड फ्लूय ने इन्ट्री केली आसल्याने तालुक्यातील नागरीकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जामखेड तालुक्यातील रेडेवाडी येथील कावळ्याचा बर्ड फ्लूय साथीचा रीपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे व पंचायत समिती चे पशुधन विकास अधिकारी डॉ ए. एस. गवारे यांनी दिली आहे.
गेल्या अकरा महीन्यांपासून संपुर्ण देश कोरोना अजाराशी लढत आसतानाच आज आपल्या देशात कोरोना लसीकरणाला सुरवात झाली आहे. मात्र दुसरीकडे कोरोना साथ आसतानाच जामखेड तालुक्यातील रेडेवाडी येथील मृत कावळ्याचा रीपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला आहे. जामखेड पासून चार किलोमीटर अंतरावर जामखेड – बीड रोडवरील रेडेवाडी फाट्याजवळ दि १२ जानेवारी रोजी दुपारी एक कावळा व कोकीळा अशा दोन पक्षांचा मृत्यू झाला होता. या बाबत ची माहीती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना मिळाली होती. संजय कोठारी यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पहाणी करुन सदरची माहीती वनविभागाचे अधिकारी व पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ ए एस गवारे यांना दिली होती.
या नंतर पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गवारे यांनी या दोन्ही पक्षांचे स्वॅब चे नमुने तपासणीसाठी पुणे येथील विभागीय प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्या मध्ये मृत पावलेल्या कावळ्याचा रीपोर्ट चार दिवसांनी म्हणजे आज दि १६ जानेवारी रोजी पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे नागरिकांन बरोबरच पोल्ट्री व्यावसायिकांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच जामखेड तालुक्यात ज्या ठिकाणी पक्षी असतील त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देणे सुरू आहे. ज्या ठिकाणी पॉल्ट्री फॉर्म आहेत तो परीसर सनीटायझर करण्याचे आदेश संबंधित पक्षी मालकांना दिले आहेत. अशी माहिती पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ ए. एस गवारे यांनी दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील निंबळक व आठवड गावात कोंबड्या मृत झाल्याची घटना समोर आली आहे. पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. निंबळकमध्ये ४६ तर आठवडला १०५ अशा १५१ कोंबड्याचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे.