रोखठोक जामखेड….

ग्रामपंचायत निवडणुकीच्या आनुशंगाने तालुक्यातील खांडवी या ठिकाणी फरार आसलेला आरोपी हा मतदान करण्यासाठी आला होता. मात्र याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली आन त्याला लगेच अटक करण्यात आली.

शरद गुलबाशा भोसले रा.खांडवी ता.जामखेड असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. काल दि १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीची मतदान प्रक्रिया होती. याच मतदानाच्या अनुशंगाने आरोपी भोसले हा खांडवी या ठिकाणी मतदान करण्यासाठी येणार आसल्याची गुप्त माहिती जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली. त्यांनी लगेच खांडवी बुथवर ड्युटी करणारे पोलीस अंमलदार पो. कॉ.रोहिदास गुंडाळे, कोतवाली पोलीस स्टेशन व होम.अरुण पोटे नेम.नगर तालुका होमगार्ड पथक तसेच खांडवी गावातील पोलीस पाटील श्री.संतोष बापुराव डिसले व डी.बी.पथकातील सपोनि.महेश जानकर,पो. कॉ.संग्राम जाधव, पोकॉ. आबासाहेब आवारे,पोकॉ.संदिप राऊत,पोकॉ.अरूण पवार यांच्या पथकास सदर मिळालेल्या बातमीतील आरोपी शदर भोसले यास ताब्यात घेण्यासाठी कळवले होते.

त्या अनुषंगाने पोलीसांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. तो मतदान केंद्रात जावुन मतदान करून बाहेर आल्यानंतर त्याला काही समजायच्या आत त्याचेवर झडप घालुन जागीच पकडण्यात आले. आरोपी भोसले याच्यावर जामखेड पोलीस स्टेशन ला गु.र.नं. 743/2020 भा.द.वि कलम 307,504,506 प्रमाणे गुन्हयात फरार होता. त्याचेवर या अगोदर जामखेड पोलीस स्टेशनला यापुर्वीही भादवि कलम -302,307 ,354 सारखे गंभिर गुन्हे दाखल असुन तो जामिनावर सुटलेला होता. या गुन्हयात आरोपी पकडण्यासाठी पोलीस पाटील श्री.संतोष डिसले यांनी खास मदत केली असल्याने त्यांचे कर्जत जामखेड चे उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी अभिनंदन केले आहे. पोलीस निरीक्षक श्री.संभाजी गायकवाड यांनी सांगितले की ,अशा प्रकारे प्रत्येकाने आपली जबाबदारी समजुन पोलीसांना सहकार्य केल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर आळा बसण्यास मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here