शहीद दिनानिमित्त शहीद जवान गणेश भोसले यांना 75 मीटर तिरंगा रॅलीने दिली मानवंदना

जामखेड प्रतिनिधी : सीआरपीएफ जवान शहीद गणेश कृष्णाजी भोसले गडचिरोली येथे 26 एप्रिल 2022 रोजी कर्तव्य बजावत असताना ऑन ड्युटी शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ जामखेड मध्ये 26 एप्रिल शहीद दिनानिमित्त आदरांजली वाहून 75 मीटर तिरंगा रॅलीने मानवंदना देण्यात आली.

प्रमुख उपस्थिती न्यायाधीश रजनीकांत जगताप, जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे, नायब तहसीलदार भोसेकर, पोलीस निरीक्षक महेश पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर , वैद्यकीय अधिकारी सुनील बोराडे वैद्यकीय अधीक्षक डॉ शशांक वाघमारे, बाल विकास अधिकारी ज्योतीताई बेल्हेकर, वीर माता शोभा भोसले ,वीरपिता कृष्णाजी भोसले, मयुर भोसले सर, प्राचार्य डोंगरे, प्राचार्य श्रीकांत होशील, प्रा मधुकर राळेभात , जैन कॉन्फरन्सचे संजय कोठारी, बजरंग डोके,नगर सेवक दिगंबर चव्हाण, कॅप्टन लक्ष्मण भोरे, आजी माजी सैनिक ,जामखेड शहरातील शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, एनसीसी कॅडेट, प्राध्यापक शिक्षक शासकीय निमशासकीय कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सर्व प्रशासकीय सर्व विभाग प्रमुख, आजी-माजी सैनिक, शैक्षणिक संस्था,17 महाराष्ट्र बटालियन एन सी सी , सामाजिक संघटना , विविध पक्ष, ग्रामस्थ,पत्रकार, यांनी आदरांजली वाहून मानवंदना दिली,

शहीद जवानांच्या कुटुंबासाठी सर्व शासन प्रशासन मदतीसाठी आहे, युवकांनी, विद्यार्थी, एनसीसी कॅडेटनी शाहिद गणेश भोसले यांना स्मरणात ठेऊन त्यांची प्रेरणा घेऊन ठेवून जिद्द कष्ट मेहनत करून देशसेवेसाठी सैन्यामध्ये भरती व्हावे. असे मनोगत जामखेड चे न्यायाधीश रजनीकांत जगताप यांनी व्यक्त केले.

तहसीलदार योगेश चंद्रे मनोगतात यांनी सैनिक सीमेवर लढतात म्हणून आपण समाजात शांततापूर्ण वातावरणामध्ये राहतो आपण प्रत्येक क्षणाला सैनिकाचा अभिमान बाळगला पाहिजे कितीही खडतर परिस्थिती असली तरी जवान देशाचे रक्षण शहीद जवान असतील त्यांच्या कुटुंबाला ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे असे मग व्यक्त करून वीर जवानांना आदरणीय व्यक्त केली.

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी. राष्ट्रधर्म पाळून राष्ट्रासाठी जगण्याची समाजासाठी जगण्याची शहीद जवान गणेश भोसले यांना स्मरून शपथ घ्यावी स्वातंत्र्य आबादीत राहण्यासाठी सैनिक कार्य करत असतात नक्षलग्रस्त भागात काही ऑपरेशन करताना अतिशय खडतर प्रशिक्षण घेऊन सैनिक कार्य करत असतात . जामखेडकरांना अभिमान वाटावा शाळेंना अभिमान वाटावा असे कार्य शहीद जवान गणेश कृष्णाजी भोसले यांनी केलेले आहे व पोलीस विभागाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो असे मनोगत व्यक्त केले.

गटविकास प्रकाश पोळ यांनी तळपत्या उन्हात कोसळत्या पावसात कडक थंडीत आपले जवान देशाचे रक्षण करीत असतात गडचिरोली नक्षल ग्रस्त भागात दुर्गम भागात आपली सेवा देत असतात . शहीद गणेश भोसले सुपुत्र जामखेडच्या मातीत जन्माला आले याचा अभिमान वाटला पाहिजे, शहीद झालेल्या कुटुंबांना समाजाने अधिकाऱ्यांनी मदत केली पाहिजे शहीद गणेश भोसले यांच्या मुलांना भविष्यात मदत लागल्यास त्याचा पाठपुरावा आम्ही करू असे मनोगत व्यक्त करून आदरांजली वाहिली.

शहीद गणेश कृष्णाजी भोसले यांच्या स्मरणार्थ 75 मीटर तिरंगा रॅलीचा प्रारंभ न्यायाधीश रजनीकांत जगताप व सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते झाला. तिरंगा रॅलीला संपूर्ण जामखेड शहरातून कडून मानवंदना दिली, शहीद जवान तुझे सलाम, गणेश भोसले अमर रहे, भारत माता की जय या घोषनेने संपूर्ण जामखेड शहर दुमदुमून निघाले व देश भक्ती वातावरण निर्माण झाले. सर्व प्रशासकीय अधिकारी ,शिक्षक प्राध्यापक, कर्मचारी ,विद्यार्थी, समस्त ग्रामस्थांनी तिरंगा रॅली उत्स्फूर्त सहभाग घेतला.

तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मानवंदना कार्यक्रम संपन्न झाला तिरंगा रॅलीचे नियोजन मयूर भोसले यांनी केले. कॅप्टन गौतम केळकर यांनी शहीद गणेश भोसले यांचा जीवनपट सांगितला सूत्रसंचालन अनिल देवरे यांनी केले मानवंदनाच्या शेवटी राष्ट्रगीत घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here