विद्यार्थी हे पुढील देशाचे भविष्य – मुख्याधिकारी साळवे

नविन मराठी प्राथमिक शाळेच्या ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

जामखेड प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी शाळेच्या पेना पासुन अधिकार्‍यांच्या पेना पर्यंत पोहचायचे आसेल तर संघर्ष करावा लागेल. संघर्ष केला तरच यश नक्की मिळते कारण आजचा विद्यार्थी उद्याच्या देशाचे भविष्य आहे आसे मत जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे साहेब यांनी व्यक्त केले.

नवीन मराठी प्राथमिक शाळेतील वर्षभरातील विविध स्पर्धा परीक्षेतील ४० गुणवंत विद्यार्थींचा सत्कार जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व विविध मान्यवरांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. या वेळी संस्थेचे कोषाध्यक्ष उमेश (काका) देशमुख, नगरपरिषद कर्मचारी प्रमोद टेकाळे, पत्रकार अविनाश बोधले, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम राळेभात मॅडम सह सर्व शिक्षक, शिक्षिका व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्याधिकारी अजय साळवे म्हणाले की विद्यार्थ्यांना मुर्ती प्रमाणे घडवण्याचे काम शिक्षक करत आसतो. पालकांबरोबरच शिक्षकांचे देखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभते त्यामुळेच शाळेतील ४० विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. आजच्या तंत्रज्ञानामुळे मुले खुप हुशार झाली आहेत.मात्र पालकांनी देखील मुलांना मोबाईल पासुन दुर ठेवण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. कोरोना काळात कोलमडलेली शिक्षण व्यवस्था सुरळीत करण्याचे काम शिक्षकांनी केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांन बरोबरच अयशस्वी विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी म्हणाले की तुम्हाला आज कमी गुण मिळाले तरी खचुन न जाता अभ्यासात कष्ट करा कारण मागच्या बाकावर बसलेला विद्यार्थी पुढे मोठा अधिकारी झाले आहेत त्यामुळे काळजी करु नका.

या नंतर पत्रकार अविनाश बोधले यांनी बोलताना सांगितले की शाळेचे गुणवंत विद्यार्थी राज्यात चमकले आहेत यावरुन शाळेचा शैक्षणिक दर्जा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आणि हा दर्जा टीकुन रहाण्यासाठी शिक्षक प्रयत्न करत आहेत मात्र पालकांनी देखील अभ्यासाच्या बाबतीत घरामध्ये मुलांवर लक्ष दिले पाहीजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बांगर सर यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका राळेभात मॅडम यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here