आ. राम शिंदे यांची नगरमधून लोकसभा निवडणुक लढण्याची तयारी, खा. विखेंचे टेन्शन वाढणार का?

अहमदनगर: भाजपचे नेते व आमदार राम शिंदे यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली आहे. दोन वेळेस मी लोकसभा लढण्यास तयारी दाखविली नाही. या वेळेस मात्र लोकसभा निवडणूक लढविण्याची माझी तयारी असल्याचे राम शिंदे यांनी सांगितले. राम शिंदे यांनी या तयारीमुळे खासदार सुजय विखे यांना टेन्शनमध्ये आणले आहे.

नगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना राम शिंदे यांनी हे जाहीर केले आहे. आ. प्रा.राम शिंदे पुढे बोलताना म्हणाले, 2014 मध्ये आमदार असताना लोकसभा लढविण्याचे पक्षाकडून विचारण्यात आले होते. त्यावेळी प्रताप ढाकणे हेही इच्छूक होते. त्यावेळी दिलीप गांधी यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. 2019 मध्ये मंत्री व नगरचा पालकमंत्री असतानाही पक्षातील नेत्यांनी लोकसभा लढविण्यास विचारले होते. काही विरोधी पक्षाची भूमिकाही माझ्या बाजूने होती. परंतु राजकीय परिस्थितीमुळे राधाकृष्ण विखे व सुजय विखे हे पक्षात आले. सुजय विखेंना निवडून आणण्यासाठी मला मदत करावी लागली आहे.

मला पक्ष राज्यसभेवर पाठविणार होता. त्यासाठी तयारी केली होती. परंतु पक्षाने मला विधानपरिषदेवर संधी दिली आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक लढण्याची माझी तयारी आहे. पक्षाचा आदेश मी मानणार आहे. लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा असल्याचे राम शिंदे यांनी म्हटले आहे.

मध्यंतरी शिवाजी कर्डिले हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. त्यावेळी आता माझी लोकसभेची जबाबदारी कर्डिले यांच्यावर आली असल्याचे सुजय विखे यांनी जाहीर केले होते. खासदार सुजय विखे यांना पक्षातून लोकसभेसाठी विरोधक नाही, असे बोलले जात होते. परंतु आता राम शिंदे यांनीही लोकसभेच्या तिकीटासाठी दावा सुरू केला आहे. त्यामुळे विखे पिता-पुत्रांचे टेन्शन वाढणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here