

दिल्ली येथील अधिवेशनासाठी जामखेडच्या अनिकेत कुलकर्णी यांची निवड
जामखेड प्रतिनिधी :तालुक्यातील युवा नेतृत्व अनिकेत कुलकर्णी यांची नुकतीच दिल्ली येथे होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रति अधिवेशनासाठी निवड करण्यात आली आहे. 25 एप्रिल ते 27 एप्रिल या कालावधीमध्ये दिल्ली येथील महाराष्ट्र सदन मध्ये हे अधिवेशन होणार आहे. देशाच्या राजकारणातील अनेक महत्त्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री या प्रति अधिवेशनाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

अनिकेत कुलकर्णी हे केंद्रीय शिक्षण समिती वर काम करतात. त्यांना शिक्षण विषयक विविध महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याची आणि ठराव मांडण्याची संधी या अधिवेशनाच्या माध्यमातून मिळणार आहे. 10 वेगवेगळ्या केंद्रीय समितीचे पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.

अनिकेत कुलकर्णी यांचे विद्यार्थी हितासाठीचे काम आणि अनुभव यामुळेच त्याची निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या या निवडीबद्दल अनेक स्थरातून त्याचे कौतुक होत आहे. या अधिवेशनानंतर एक शिक्षण विषयक अहवाल तयार करून राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना देणार असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.








