जामखेड रोखठोक…..

माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातुन साकत ग्रामपंचायतमध्ये दहा वर्षांत कोट्यावधी रुपयांची विकासकामे करून रस्ते, वीज व पाणी याबाबत गावाला स्वयंपूर्ण बनविले आहे. विरोधकांना जर गावाचा विकास दिसत नसेल तर त्यांना मोतीबिंदू झालेला आहे. त्यांनी डोळ्याचे आॅपरेशन करून विकास पाहावा आम्ही केलेला विकास जनतेला दिसत आहे विरोधकांना नाही. विकासाच्या बळावर परत संपूर्ण पॅनल विजयी होऊन चौथ्यांदा सत्तेत येणार आहोत. असा विश्वास डॉ भगवानराव मुरुमकर यांनी केला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना डॉ भगवानराव मुरुमकर म्हणाले की, आम्ही सत्तेच्या माध्यमातून गाव व वाडी वस्ती रस्त्याने जोडले अनेक ठिकाणी पेव्हिंग ब्लाॅक बसवले जलयुक्त शिवार योजनेत दर्जेदार कामे केल्याने गावाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली व 33 केव्हीचा प्रश्न मार्गी लावल्याने वीजेचा प्रश्न सोडविला गावाचे श्रद्धास्थान असलेल्या व 65 वर्षापासून अखंड विनावादन व नंदादीप सुरू असलेल्या विठ्ठल मंदिराचा क वर्ग तिर्थक्षेत्रात समावेश करून सभामंडप व भव्य भक्त निवास केले.
आम्ही वाडी वस्तीवरील रस्ते करण्यासाठी झटत आसताना विरोधकांनी मात्र ते अडविण्याचा प्रयत्न केला त्यामुळे काही रस्त्यांची कामे बाकी आहेत. तसेच विरोधक म्हणतात शाळा काॅलेज मुळे गावाचा विकास झाला पण काॅलेज फक्त पैसे कमावण्यासाठी काढले आहेत. गावासाठी काडीचाही फायदा त्यात नाही. या काॅलेजमुळे अनेकांना भुमीहीन व्हावे लागले आहे. अनेकांना बिनपगारी राबवून घेतलेले आहे. अनेकांची पिळवणूक केलेली आहे.
तसेच विरोधकांनी सांगितले की, आरो प्लॅन्ट मध्ये पाणी नाही विरोधकांनी त्यात पाच रूपये टाकावेत व वीस लीटर पाणी मिळेल.
पाच वर्षांत चार सरपंच झाले याविषयी बोलताना डॉ. मुरूमकर म्हणाले की, आम्ही कधीच जातीयवाद व भावकी वाद करत नाही आम्ही चार पैकी तीन सरपंच वराट केले यातील एक सध्या विरोधकाकडे आहे आम्ही संधी दिली पण सरपंच पदाच्या काळात ती व्यक्ती नशा करत रस्त्यात पडलेली असायची आम्ही पद दिले पण त्या पदाचा मान त्यांना राखता आला नाही.
विरोधकांनी गावातील तरूणांना योग्य वळण लावायास हवे होते पण ते तरूणांना व्यसनाधीन करतात. विकास कामात आडकाठी आणतात रस्ते अडवतात. निवडणूकीपुर्ते भावकी, वराट – मुरुमकर करतात नंतर पाच वर्षे गायब असतात. तीन पंचवार्षिक निवडणुकीत सपाटून मार खातात पण तरीही परत स्वतः उभे राहतात. कार्यकर्त्यांची संधी हिरावतात. सत्तेचा मोह सुटत नाही. काही ठिकाणी सत्तेत आसताना कसलाही विकास केलेला नाही.
आम्ही मात्र सत्तेच्या माध्यमातून गावाचा विकास केला. मंदिरांचा जिर्णोद्धार, रस्ते, वीज व पाणी याबाबत गावाला स्वयंपूर्ण बनविले, गावच्या विकासासाठी व विजेचा
प्रश्न सोडविण्यासाठी माजी सरपंच हनुमंत पाटील व मी एकत्र आलो व 33 केव्हीचा प्रश्न सोडविला. माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातुन कोल्हेवाडी ते देवदैठण रस्ता डांबरीकरणास मंजुरी मिळवली. साकत फाटा ते पाटोदा सरहद्दीपर्यत पाच कोटी रुपये मंजूरी मिळवली भव्य रस्ता होत आहे. मुख्यमंत्री पेयजल योजनेतून वाडी वस्तीवरील पाण्याचा प्रश्न सोडविला वंचित व गरजू लोकांना घरकुलांचा
फायदा विहिरी चा लाभ दिला केलेल्या विकास कामांमुळे परत श्री साकेश्वर जनसेवा पॅनल बहुमताने विजयी होणार आहे मतदार विरोधकांना धुळ चारणार आहेत. असा विश्वास डॉ भगवानराव मुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
डॉ भगवानराव मुरुमकर यांच्या नेतृत्वाखाली व हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साकेश्वर जनसेवा पॅनल बहुमताने विजयी होणार आहे. राहिलेली विकासकामे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सोडवली जातील असे हनुमंत पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here