जामखेड प्रतिनिधी
जनसेवा पॅनलच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. गावचा विकास होण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. कारण आम्हाला राजकारणापेक्षा समाजकारणाची आवड आसल्याने गावचा विकास आम्ही करणारच असे मत तुषार पाटील यांनी व्यक्त केले.
नुकताच नान्नज येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या आनुशंगाने जेष्ठ नेते तुषार पवार, माजी उपसरपंच सुनिल हजारे व अमजत पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा पॅनलच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना तुषार पवार पाटील म्हणाले की मी या पॅनल सोबत आसण्याचे कारण म्हणजे गावाचा विकास झाला पाहिजे, तसेच गावातील शाळांचा दर्जा कसा वाढेल व या मधुन चांगले विद्यार्थी कसे घडतील याकडे लक्ष देण्यात येणार आहेत. या पॅनल च्या माध्यमातुन नान्नज बसस्थानक, कॉंक्रेट रस्ते, पेव्हींग ब्लॉग व धार्मिक स्थळांचा विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, भाजपाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अमजद पठाण,बाजार समितीचे माजी सभापती तुषार पवार, पत्रकार लियाकत शेख, माजी सरपंच सुनिल हजारे भा ज पा अल्पसंख्याक सेल जिल्हा अध्यक्ष अमजद पठाण धनुसेठ गावडे संतोष मोहळकर आप्पा मोहळकर गोविंद हजारे आदी उपस्थित होते
जनसेवा पैनेल मध्ये सर्व उमेदवार सुसंस्कृत समाजाच्या अडीअडचणी समजून घेनार आहे त्या मुळे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होणार आहे.