रोखठोक जामखेड…..
खर्डा परीसरात नायगाव या ठिकाणी पोलीसांनी बेकायदेशीर विक्री करत आसलेल्या देशी दारू विक्री करत आसलेल्या ठीकाणी छापा टाकून २१ हजारांची दारु जप्त करुन एकुण दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
जामखेड तालुक्यात पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी कारवायांचा धडाका सुरू ठेवला असुन अनेक अवैद्य धंदे बंद केले आहेत. तरी देखील छुप्या पद्धतीने अनेक ठिकाणी अवैद्य धंदे सुरू आहेत. याच अनुषंगाने जामखेड पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नायगाव गावात दोन ठीकाणी अवैद्य दारु विक्री सुरू आसल्याची गुप्त माहिती मिळाली. या घटनेत दोघा जणांनवर कारवाई करण्यात आली आहे. या मध्ये आरोपी रोहिदास पांडुरंग उगले वय ३२ वर्षे रा नायगाव ता जामखेड याच्या कडुन २०,११३ रु किं चा देशी विदेशी कंपनीच्या दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच दुसर्या ठिकाणी आरोपी नायनदेव कान्हू खवळे वय ६० रा नायगाव ता जामखेड याच्या कडुन १४५६ रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. दोघांनकडुन एकुण २१५६९ रुपयांची देशी विदेशी दारू बाॅक्स जप्त केले आहेत.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व सपोनि महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना शेंडे, पो.कॉ मनोज साखरे ,पो.कॉ शशी मस्के, पो.कॉ सचिन पिरगल ,यांच्या पथकाने केली आहे.






