सार्वजनिक भिमजयंती महोत्सव समिती स्थापन,समितीच्या अध्यक्षपदी राजन समिंदर ( सर) यांची निवड.

जामखेड प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शहर उत्सव समितीची बैठक झाली. या वेळी सर्वसमावेशक कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. त्यानुसार सार्वजनिक भिमजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी राजन समिंदर (सर) यांची निवड झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जामखेड शहरात महोत्सव समिती स्थापन करण्याची संकल्पना सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी गतवर्षीप्रमाणे मांडली. त्यासाठी डाँ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह ( बाजारतळ) येथे बैठक घेण्यात आली. यावेळी जामखेड चे पोलीस निरीक्षक महेश पाटील अध्यक्षस्थानी होते. बैठकीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच सर्वसमावेशक कार्यकारिणीची स्थापना झाली. जामखेड शहर भिमजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी राजन समिंदर (सर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी रवि सोनवणे, खजिनदार रजनीकांत नाना मेघडंबर तर सल्लागार म्हणून सिध्दार्थ साळवे( सर), डॉ. सचिन घायतडक,सचिन (जाॅकी) सदाफुले यांची निवड करण्यात आली.

समितीतर्फे 9 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.14 एप्रिल रोजी सकाळी 10:00 वाजता खर्डा चौक येथे अभिवादन करण्यात येईल त्यानंतर शहरातील सर्व तैलचित्रांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल त्यानंतर सायंकाळी 5 वाजता बाजारतळ येथुन भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सर्व जाती-धर्मातील लोक सहभागी करून घेण्यात येईल.

या बैठकीला पोलीस निरीक्षक महेश पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभाकर सदाफुले सर, जेष्ठ नेते पोपट घायतडक, नामदेव गंगावणे सर, बौध्दाचार्य अशोक आव्हाड, बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड, बौद्धाचार्य बलभीम जावळे, राजेंद्र ( तात्या) सदाफुले,प्रविण घायतडक, मुकुंद घायतडक, रत्नाकर सदाफुले, प्रा.सुनिल जावळे सर, संजय घोडके सर, प्रताप पवार सर, दिपक तुपेरे सर, विनोद सोनवणे सर, रजनीकांत साखरे सर, संभाजी तुपेरे सर, ज्ञानदेव साळवे सर,सचिन आण्णा सदाफुले,बाबा सोनवणे, सुर्यकांत कदम सर,प्रा.राहुल आहिरे,सुहास आव्हाड सर,अभिमान घोडेस्वार सर,सदाशिव भालेराव सर,जितेंद्र आढाव सर,संदिप तुपेरे,सुशीलकुमार सदाफुले, बाळासाहेब आव्हाड, दादासाहेब घायतडक,जयवंत चव्हाण,विनोद घायतडक,रवि सदाफुले,प्रमोद सदाफुले,दिपक घायतडक,दिनेश घायतडक,राजू घायतडक,तानाजी घायतडक,रोहीत राजगुरु,किशोर कांबळे,संतोष थोरात,अतिश डाडर,मिलिंद हराळ,यशवंत काकडे,सुजित धनवे,विजय साळवे,सुधीर कदम,सोमनाथ आढाव..आदीसह सिध्दार्थ नगर, मिलिंद नगर,सदाफुले वस्ती,महात्मा फुले नगर, साठे नगर, आरोळे वस्ती,वडाची वस्ती. येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले व माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी केले. दरवर्षी अशीच परंपरा कायम ठेवण्यात येईल असा निर्धार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here