सकल हिंदू समाज जामखेडच्या वतीने श्रीरामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

३१ मार्च रोजी निघणार जामखेड शहरातुन भव्य शोभायात्रा

जामखेड : सकल हिंदू समाज जामखेडच्या वतीने श्रीरामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे. दि ३१ मार्च रोजी जामखेड शहरातुन भव्य आशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

जामखेड तालुक्यात विविध ठिकाणी रामनवमी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुशंगाने जामखेड शहरात देखील सकल हिंदू समाज जामखेडच्या यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये शुक्रवार दि. ३१ मार्च रोजी दुपारी चार वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्केट यार्ड, बीड रोड येथुन भव्य आशी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

या मिरवणुकीचे खास आकर्षण म्हणजे हरियाणा येथील वीर हनुमान साक्षात जिवंत देखावा दाखवण्यात येणार आहे तसेच हरियाणा येथील शंभु महादेव व अघोरी वेषातील देखील जिवंत देखावा आसणार आहे.
याच बरोबर श्री शंभुसुर्य मर्दानी खेळ यांचे शिवकालीन युद्धकलेचे सादरीकरण, श्री शंभुसुर्य मल्लखांब पथक यांचे मल्लखांब प्रात्यक्षिकाचे सादरीकरण, श्री शंभुसुर्य रोप मल्लखांब पथक यांचे रोप मल्लखांब प्रात्यक्षिकाचे सादरीकरण, अश्वदल, वारकरी टाळपथक, अयोध्या येथे कारसेवेत पुजन केलेल्या प्रभू श्रीरामचंद्र ,सिता माता, लक्ष्मण, हनुमान यांच्या पितळी मुर्त्या
, प्रभू श्रीरामचंद्र यांची ७ फुटी मूर्ती, कनकंबा हलगी ग्रुप करकंब व DJ साऊंड सिस्टीम आसणार आहे. आशा भव्य दिव्य मिरवणुकीत जामखेड तालुक्यातील सर्वांनीच मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल हींदू समाज जामखेड तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here