

ॲड.डॉ.अरुण जाधव यांच्या अंगाला हात लावण्याआधी गाठ आमच्याशी आहे.- आदिवासी पारधी समाज
जामखेड येथिल आदिवासी पारधी समाज बांधवांच्या वतीने दि २७ मार्च रोजी जामखेडचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दि- २१ मार्च २०२३ रोजी घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध व गाव गुंड व खंडणी बहादरांचा बंदोबस्त करण्यात यावा तसेच त्यानंतर याच घटनेतील या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी ॲड.डॉ.अरुण जाधव यांना दमबाजी करण्याचा प्रकार केला आहे. या सर्व घटनेचा आदिवासी पारधी समाजाच्या वतीने जाहीर निषेधाचे निवेदन देण्यात आले. तसेच संबधित लोकांवर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

ॲड.डॉ.अरुण जाधव हे गेल्या ३२ वर्षांपासून अहमदनगर, पुणे, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद सह संपूर्ण महाराष्ट्रात विविध विषयाला घेऊन काम करतात. त्यांनी अनेक ठिकाणी संविधानिक मार्गाने मोर्चे, आंदोलने, उपोषणाच्या माध्यमातून वंचित, बहुजन, भटके विमुक्त, आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. तसेच सामाजिक कामामध्ये त्याचा वेगळा ठसा आहे. दिन दलितांचा कैवारी म्हणून त्याची समाजामध्ये वेगळी ओळख आहे आणि अशा समाजासाठी झटणाऱ्या अशा देव माणसाला अशी धमकी देणे ही समाजाला न पटणारी गोष्ट आहे. या घटनेच्या निषेधार्थ जामखेडमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला होता. हा देश सविंधानाच्या विचारावर चालणारा आहे. गेली अनेक दिवसापासून जामखेड शहरांमधील गोर-गरीब, कष्टकरी, शेतकरी, मजुर, लोककलावंत, अंध-अपंग व महिला यांच्यावरती अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार, शोषण, पिळवणूक केली जात आहे, त्याचबरोबर जामखेड शहरातील गावगुंडांनी टोळ्या तयार करून धमकी देऊन दहशत निर्माण करणे, खंडणी मागणे, गोर गरीब महिलांवरती जबरी अत्याचार करणे, असे प्रकार दिवसां-दिवस वाढत चालले आहेत.

असाच एक प्रकार दि- २१ मार्च २०२३ रोजी रात्री जामखेड शहरातील कलाकेंद्रवर २० मुलांच्या टोळीने हातात शस्त्र घेऊन महिलांना मारहाण व त्यांची छेडछाड करण्यात आली व त्यांना धमकी देऊन खंडणी द्या नाहीतर कलाकेंद्र चालु देणार असा दम दिला.

यावेळी निवेदन देताना आदिवासी पारधी समाजाचे नेते विशाल पवार बोलताना म्हणाले की, ॲड.डॉ.अरुण जाधव यांना दमबाजी करणाऱ्या व जामखेडमध्ये दहशतीचे वातावरण तयार करणाऱ्या गावगुंडाचा योग्य प्रकारे बंदोबस्त करावा अन्यथा जामखेड आदिवासी बांधवांच्या वतीने मोठे आंदोलन उभे करण्यात येईल. तसेच ॲड.डॉ.अरुण जाधव यांच्या अंगाला हात लावला तर गाठ आमच्याशी आहे.

यावेळी उपस्थित ईश्वर पवार, गणपत कराळे, प्रमोद गंगावणे, सचिन भिंगारदिवे, साधना पवार, परमेश्वर काळे, संतोष चव्हाण सोनेगाव, विजू काळे, दीपक काळे ,दिपाली काळे ,मा.आयकास काळे , शामराव काळे, लोचन पवार, शब्बीर भोसले, कुसुम शिंदे, अडुसठ पवार,कुसुम शिंदे, भावजाबाई काळे, आबाशा काळे, माया काळे, रजनी बागवान, नागेश काळे,आलेश काळे, महेश काळे, निलेश काळे, रेश्मा शिंदे, प्रकाश पवार, अंजली काळे आदी उपस्थित होते.






