Home ताज्या बातम्या राष्ट्रीय महामार्गासंबधी जामखेडच्या व्यापाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

राष्ट्रीय महामार्गासंबधी जामखेडच्या व्यापाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

राष्ट्रीय महामार्गासंबधी जामखेडच्या व्यापाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

जामखेड : जामखेड शहरातील पंचदेवालय ते सौताडा या राष्ट्रीय महामार्गाच्या रोडचे अंतर तेवढेच ठेवावे परंतु इतर युटीलिटी व संबंधित डिव्हायडर एरिया हा कमी करण्यात यावा या मागणीसाठी जामखेड चे व्यापारी आकाश बाफना सह व्यापारी असोसिएशनने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्जत येथील दैऱ्या दरम्यान भेट घेतली. यावेळी व्यापाऱ्यांना याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नुकतेच कर्जत दैऱ्यावर आले आसता त्यांची जामखेड येथिल व्यापाऱ्यांनी भेट घेऊन शहरातुन जाणार्‍या पंचदेवालय ते दुधडेअरी पर्यंतच्या रस्त्याबाबत चर्चा केली. यानंतर जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्ग मध्ये दोन किलोमीटर अंतरा मध्ये डिव्हायडर एरिया व युटिलिटी एरिया हा कमी करावा याकरिता जामखेड व्यापारी असोसिएशन च्या वतीने निवेदन देण्यात आले. याबाबत जामखेड आसोशियन च्या वतीने जामखेड शहरात बंद देखील पुकारण्यात आला होता. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले. या वेळी जामखेड व्यापारी असोसिएशन चे शरद शिंगवी, आकाशशेठ बाफना, अशोक (काका) बाफना, कांतीलाल (काका) खिंवसरा सह अनेक व्यापारी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!