

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जत मधे असताना आ.रोहित पवारांचा बारामतीत’करेक्ट कार्यक्रम’
मतदारसंघातील रस्त्यांसाठी पंधराशे कोटी मंजूर केल्या बद्दल नितीन गडकरी यांचा केला सत्कार
जामखेड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस हे काल शनिवारी कर्जत शहरात आले असता त्यांच्या हस्ते पोलीस वसाहतीच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर इतर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि प्रवीण घुले यांचा जाहीर पक्षप्रवेश, शेतकरी मेळावा अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार राम शिंदे यांनी केले होते.

या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक वर एक मोठी पोस्ट करून काल झालेल्या एकूणच घडामोडींवर उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना काल पक्षप्रवेश देऊन मोठा गाजावाजा करण्यात आला त्यांना मात्र कार्यक्रमात साधे भाषणही करून देण्यात आलं नाही, आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला असा टोला आमदार रोहित यांनी लगावला.

तसेच काल उद्घाटन झालेल्या पोलीस वसाहतीची सर्व श्रेय आपले असून विरोधक जाणीवपूर्वक चुकीची माहिती उपमुख्यमंत्री फडवणीस यांना देत आहेत. तसेच आपण काल कार्यकर्त्यांबरोबर मतदार संघात जाणीवपूर्वक नव्हतो असा प्रचार करण्यात आला. मात्र आपण बारामती मध्ये पवार साहेब आणि अजितदादा यांच्यासोबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत होतो. गडकरी यांनी माझ्या मतदारसंघात पंधराशे कोटी रुपये रस्त्यांसाठी मंजूर केलेले आहेत. या निमित्ताने त्यांचा मतदार संघाच्या वतीने सत्कार करण्याचा कार्यक्रम आम्ही तिथे कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता.

मी विकासाचं राजकारण करणारा लोकप्रतिनिधी असून विरोधक केवळ माझ्याबद्दल जनतेत आणि उपमुख्यमंत्री फडवणीस यांच्याजवळ गैरसमज पसरवत असून त्यांना चुकीची माहिती देत असल्याचा आरोपही आमदार रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे. आपण मंजूर केलेली अनेक कामांचे उद्घाटन यापूर्वी झालेली आहे. तसेच सत्ता बदलापूर्वी अनेक कामांना मी मंजुरी दिली आता ते पूर्णत्वास गेलेले असून त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांनी केलं याचा मला आनंद आहे. मात्र मी मंजूर केलेल्या शेकडो कोटींच्या कामांना सध्याच्या सरकारने माझ्या विरोधकांनी चुकीची माहिती दिल्याने स्थगिती दिली गेली असली तरी आपण उपमुख्यमंत्री फडणवीस त्यांच्याकडे या कामांच्या मंजुरी साठी प्रयत्न करून तुम्हीच या कामांचा शुभारंभ करा अशी विनंती करणार असल्याचे म्हंटले आहे.

मात्र मी मंजूर केलेली कर्जत-जमखेडची पोलीस वसाहतीचे कामाचे श्रेय माझे विरोधक घेत असून उपमुख्यमंत्री फडवणीस यांना चुकीची माहिती दिली गेल्याचं दिसून येत असल्याचा आरोपही आमदार रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये केला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही आ.रोहित यांनी पोस्ट मधे भाष्य केले असून त्यात, पालकमंत्री विखे पाटील साहेब हे तर ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडून मला आणि माझ्या मतदारसंघाला खूप अपेक्षा आहेत.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील पार्सल परत पाठवण्याचं आवाहन त्यांनी कार्यक्रमात केल्याचं मला काही जणांनी सांगितलं. पण विखे-पाटील साहेबांचे आजोबा आणि माझ्या आजोबांचे त्यांच्या काळापासून खूप चांगले संबंध होते, तेंव्हापासून दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखतात. त्यामुळं त्यांनी पार्सल परत पाठवण्याचं केलेलं आवाहन ऐकूण मला विधानसभेच्या निकालानंतर विखे पाटील साहेब यांच्यावर झालेल्या आरोपांची आठवण झाली. त्यामुळं ते कुणाबाबत बोलले हे उघड गुपित आहे. पण माझ्या विकासाचं ३०० कोटी रुपयांहून अधिक मोठ्या विकास कामांच्या जंबो पार्सलला या सरकारने स्थगिती दिली आहे. ती उठवण्यासाठी पालकमंत्री म्हणून विखे यांनी मदत करावी, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी पोस्ट मधे व्यक्त केली.


