उद्या व्यापाऱ्यांचा एकमताने जामखेड बंदच ठेवण्याचा निर्णय, आफवानवर विश्वास ठेऊ नका- व्यापारी असोसिएशन जामखेड
जामखेड प्रतिनिधी : जामखेड शहरातील पंचदेवालय ते सौताडा या राष्ट्रीय महामार्ग रोड अंतर तेवढेच ठेवावे परंतु इतर युटीलिटी व संबंधित डिव्हायडर एरिया हा कमी केला तर बहुसंख्य लोकांचा दैनंदिन जीवन विस्कळीत होणार नाही व व्यापार पेठ अबाधित राहील यासाठी उद्या आठवडी बाजार दिवशी जामखेड बंदच रहाणार आहे. याबाबत पुन्हा आज दि 10 मार्च रोजी सायंकाळी जय हिंद चौक येथे जामखेड मार्केट कमिटीतील बहुसंख्य व्यापारी तसेच जामखेड व्यापारी असोसिएशन मध्ये बैठक झाली या मध्ये एकमताने जामखेड बंद ठेवण्याचा निर्णय झाला तरी कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे अवहान जामखेड येथिल व्यापारी असोसिएशन च्या वतीने करण्यात आले आहे.
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाबत बाजारपेठ टीकुन रहावी तसेच या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे अंतर तेवढेच ठेवावे परंतु इतर युटीलिटी व संबंधित डिव्हायडर एरिया हा कमी केला तर बहुसंख्य लोकांचा दैनंदिन जीवन विस्कळीत होणार नाही व व्यापार पेठ अबाधित राहील असे मत व्यापारी असोसिएशन तर्फे व्यक्त करण्यात आले आसुन याबाबत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना आज दुपारी निवेदन देखील देण्यात आले आहे.
यानंतर याबाबत उद्या आठवडी बाजार आसल्याने जामखेड बंद रहाणार की नाही या बाबत नागरीकांन मध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यानंतर आज सायंकाळी पुन्हा जय हिंद चौक येथे जामखेड मार्केट कमिटीतील बहुसंख्य व्यापारी तसेच जामखेड व्यापारी असोसिएशन मधील बैठक झाली यावेळी उद्या दिनांक 11 मार्च 2023 रोजी एकमताने बंद ठेवण्याचा निर्णय झाला तरी इतर कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता उद्या बंद ठेवावे व सहकार्य करावे असे अवाहन जामखेड येथिल व्यापारी असोसिएशन तर्फे जामखेडकरांना करण्यात आले आहे.