गावच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करु- सरपंच उमेदवार, अश्विनी सागर कोल्हे
जामखेड (प्रतिनिधी.दि, १३) गावात रस्ते, वीज व पाण्याचा प्रश्न तसेच महिलांचे आरोग्य विषयक प्रश्न प्राधान्याने सोडवून महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सशक्त बनवून राजुरी गाव आदर्श करणार आहोत. तसेच गावच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सरपंच पदाच्या उमेदवार अश्विनी सागर कोल्हे यांनी सांगितले.
राजुरी गावचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवून घराघरात स्वच्छ फिल्टर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच गावाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी घरोघरी शौचालये व त्यांच्या वापरासाठी घराघरात नळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. शेतकरी, युवक यांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
यावेळी बोलताना अश्विनी सागर कोल्हे म्हणाल्या की, गावाच्या विकासासाठी आम्ही सर्वाना बरोबर घेऊन काम करू राजकारण फक्त निवडणुकीपुरतेच करणार नंतर सर्वाना बरोबर घेणार तसेच शैक्षणिक विकासासाठी गावातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणार असेही सांगितले.गावाच्या विकासासाठी शासनाच्या योजना वंचित व गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार तसेच गावात पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना प्रभावी पणे राबविणार असल्याचे सांगितले. गावाच्या विकासासाठी सुशिक्षित लोकांनी राजकारणात यावे असे आवाहन अश्विनी सागर कोल्हे यांनी केले आहे. या नंतर जय श्रीराम ग्रामविकास पॅनलच्या सर्व च्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देण्यचे आवाहन अश्विनी सागर कोल्हे यांनी केले आहे.