आ.प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते झाले सुरेश कारंडे यांच्या पोल्ट्री फार्मचे उद्घाटन

जामखेड, दि.१२ डिसेंबर

आमदार शिंदे यांच्या हस्ते तालुक्यातील बावी येथिल सुरेश कारंडे यांच्या पोल्ट्री फार्मचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी त्यांना या नवीन पोल्ट्री फार्मच्या व्यवसायास शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी गावातील शेतकऱ्यांनी लाईट ची डी पी मिळत नसल्याची अडचण सांगितली. याची तातडीने आमदार शिंदे यांनी दखल घेत कर्जत येथ मुख्य महावितरण कंपनीचे अधिकारी यांना फोन लावून तात्काळ डीपी मिळावी अशी सूचना दिली त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

पोल्ट्री फार्मचे उद्घाटन समारंभ प्रसंगी
उपस्थित श्री.सोमनाथ पाचरणे (मा. जि.परिषद सदस्य),सरपंच ओमासे पिंपरखेड,श्री.गौतम कोल्हे (जवळा उपसरपंच),श्री. दादासाहेब पवार (मा.सरपंच),श्री लालासाहेब पवार, श्री.राम पवार युवा नेते भाजपा अजय सातव फक्रबाद,गावचे उपसरपंच दादासाहेब मंडलिक,ग्रामसेवक तांबोळी,श्री रोहित कारंडे (महात्मा फुले जन आरोग्य समन्वयक), श्री.केशव मुरूमकर – श्री भीमराव निकम (सोसायटी संचालक),श्री अंबादास पवार,श्रीराम शेरे,श्री महादेव कारंडे (ग्रा.सदस्य),श्री सुनील कारंडे, श्री.भाऊसाहेब चिकणे, श्री.अशोक बिरंगळ, श्री.नागेश बिरंगळ, श्री अमृत कारंडे, श्री राहुल पवार,अक्षय कारंडे,श्री अशोक राऊत ग्रा. कर्मचारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here