समाजातील प्रत्येक घटकाला कायद्याची माहिती कळावी यासाठी शिबिराचे आयोजन – न्यायाधीश रजनीकांत जगताप.

श्री नागेश विद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न.

जामखेड प्रतिनिधी

समाजातील प्रत्येक घटकाला कायद्याची ओळख व्हावी, कायदा काय असतो, तसेच एखाद्या कडुन कोणता गुन्हा होऊ नये व कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी या कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. असे मत जामखेड चे न्यायाधीश रजनीकांत जगताप यांनी व्यक्त केले.

जामखेड तालुका विधी सेवा समिती व वकील संघ व श्री नागेश विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागेश विद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश रजनीकांत जगताप, तहसीलदार योगेश चंद्रे, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, केंद्रप्रमुख नारायण राऊत , स्कूल कमिटीचे हरिभाऊ बेलेकर, प्राचार्य मडके बी. के, उपप्राचार्य तांबे ए. एन ,पर्यवेक्षक रघुनाथ मोहळकर, मुख्याध्यापिका चौधरी के. डी, ॲड एम एन नागरगोजे, रमेश बोलभट, एनसीसी प्रमुख मयूर भोसले, सुनील भमुद्रे, विनोद नाईकनवरे, अनिल चव्हाण ज्ञानेश्वर चव्हाण, नागेश संकुलातील शिक्षक विद्यार्थी सर्व सेवक उपस्थित होते.

पुढे बोलताना न्यायाधीश रजनीकांत जगताप म्हणाले की आपल्या आजुबाजुला असणारे उसतोड मजुर कींवा उपजीविका भागवण्यासाठी स्थलांतरित झालेल्या मुलांना शिक्षण मिळत नाही. त्यांना शिक्षणाचे महत्व पटवुन देण्याची गरज आहे. जे मुलं आजुनही काही कारणास्तव शाळाबाह्य असतील तर अशा मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी विधीसेवा समितीच्या कार्यालयामध्ये संपर्क साधावा अशा मुलांचे वय निघुन गेले असले तरी त्याला त्याच्या वया प्रमाणे शाळेत प्रवेश मिळवुन देऊ.

समाज्या मध्ये वावरत असताना लहान मुलांवर अन्याय होत असतील तर त्यांना वाचा फोडण्यासाठी तसेच अमानवीय कृत्य कींवा विद्यार्थ्यांची रँगींग कोण करण्याचा प्रयत्न केला तर कायद्यात कठोर शिक्षा आहे. विद्यार्थ्यांनी कौटुंबिक व कोणत्याही हिंसाचाराला बळी पडू नये असे देखिल न्यायाधीश जगताप यांनी सांगितले. विद्यार्थी विद्यार्थिनीना कोणतीही अडचण असली तर विद्यालय, पोलीस प्रशासन किंवा तालुका वीधी सेवा समितीशी संपर्क साधावा असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच लोक न्यायालय, मध्यस्थी, कौटुंबिक हिंसाचार कायदा, वरिष्ठ नागरिकांचे अधिकार, विद्यार्थ्यांचे अधिकार, याविषयी शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात आले.

तहसीलदार योगेश चंद्र यांनी शिक्षण हक्क कायदा संदर्भात माहिती दिली. तसेच विद्यालयामध्ये विधी सेवा प्राधिकरण कायदेशीर माहिती, वरिष्ठ नागरिकांचे अधिकार, लोकन्यायालय व सर्व कामकाज, वैकल्पिक वाद निवारण पद्धती, रॅगिंग, बालकांचे हक्क कायदे यांचे पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य मडके बी के, सूत्रसंचालन रमेश बोलभट आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका चौधरी के डी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here