नाविन्य रुपात एस पी फिटनेस क्लब वाढवणार आता जामखेड करांचा फिटनेस

जामखेड प्रतिनिधी

गेल्या पंधरा वर्षांपासून जीम मध्ये कार्यरत असलेल्या एस पी फिटनेस क्लब ने आता नव्याने पुन्हा एकदा पुणे व मुंबई प्रमाणे इम्पोर्टेड मशीन द्वारे एस पी फिटनेस क्लब जामखेडकरांच्या सेवेत आले आहे. याचा उद्घाटन सोहळा नुकताच मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

दिवसभर काम करायचं म्हणजे तेवढी शक्ती आपल्या शरीरात हवी. त्यासाठी व्यायाम हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. नियमित घरच्या घरी व्यायाम करण्याचा विचार प्रत्येकजण करतो, मात्र ते कोणाकडून होत नाही. मग त्यासाठी जिमचा रस्ता धरला जातो. एकदम ब्रँडेड गोष्टींची सवय लागलेल्या तरुणाईला जिमही अशीच मोठी, प्रशस्त आणि आधुनिक सोय-सुविधांनी सज्ज हवी असते. कोणत्या जिममध्ये कसं ट्रेन केलं जातं? ट्रेनर कसे असतात? या सगळ्यांची माहिती तरुणाई शोधत असते. आणि याच अनुशंगाने जामखेडला आता गेल्या पंधरा वर्षांपासून सेवेत असलेल्या एस पी फिटनेस क्लब मध्ये नवीन इम्पोर्टेड मशीन जामखेड करांसाठी उपलब्ध केल्या आहेत.

या मध्ये एस पी फिटनेस क्लब मध्ये नविन पद्धतीचे ट्रेड मील, स्पीन बाईक एयर बाईक, तसेच अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच आलेले कर्व ट्रेडमिल हे फक्त जामखेड मध्ये उपलब्ध झाले आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे लाईट गेली तरी त्यावर रनिंग करण्याची सुविधा असणार आहे. त्याच बरोबर हार्ड कोर, इम्पोर्टेड इक्युमेंट, स्टीम बाथ ची देखील सुविधा या ठीकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या नविन एस पी फिटनेस क्लब चे उद्घाटन अहमदनगर जनरल सेक्रेटरी बॉडी बिल्डर ॲण्ड फिटनेस असोसिएशन चे प्रा जयंत गिते यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मन्सुर सुभेदार, प्रा. मधुकर (आबा) राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी , शामीरभाई सय्यद, मोहन पवार, पवन राळेभात, बिभिषण धनवडे, ॲड.बंकटराव बारवकर, नय्युमभाई सुभेदार, उमरभाई कुरेशी, रविंद्र कडलग, प्रा. लक्ष्मण ढेपे, मुख्तार सय्यद, नासीर बिल्डर, जुबेर शेख, वसीम सय्यद, जमीर सय्यद, अजहर सय्यद सर, हनीफ कुरेशी, तायर पठाण, विकीशेठ उगले पाटील, बजरंग डोके (मेजर), कॅप्टन लक्ष्मण भोरे, नासीर सय्यद आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी खास आकर्षण म्हणून बॉडी शो चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जाकीर शेख व जाहेद बागवान (सर) यांनी केले तर आभार जाकीर पठाण यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here