विघ्नहर्ता हॉस्पिटल कडुन अध्यक्ष तात्याराम बांदल यांचा सत्कार

जामखेड प्रतिनिधी.

विघ्नहर्ता हॉस्पिटल कडुन नवनिर्वाचित जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष तात्याराम बांदल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच हॉस्पिटल च्या सर्व संचालकांची पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या वेळी विघ्नहर्ता हॉस्पिटल चे चेअरमन डॉ अनिल गायकवाड बोलना म्हणाले की केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष तात्याराम बांदल यांचे काम चांगले आहे. चुरशीच्या लढतीत त्यांचा विजय झाला. सर्व सामान्य कुटुंबातील माणुस अध्यक्ष झाला आहे. येथुन मागिल काळात देखील त्यांच्या हातुन केमिस्ट बांधवाना मदत झाली आहे त्यामुळे केमिस्ट बांधवानी त्यांना स्विकारले आहे. तसेच पुढील काळात त्यांच्या हातुन केमिस्ट बांधवांची सेवा घडावी आसे बोलुन त्यांना व त्यांच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

या नंतर विघ्नहर्ता हॉस्पिटल चे चेअरमन डाॅ. अनिल गायकवाड, डॉ. प्रदीप काञजकर, डॉ बाळासाहेब मुळीक, डॉ प्रदिप कुडके, डॉ प्रशांत वारे, डॉ सागर शिंदे व विघ्नहर्ता हाॅस्पिटल सर्व स्टाफ यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशन निवडणूकिमंध्ये विजयी झालेले उमेद्वार तात्याराम बांदल यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here