

राज्यस्तरीय शालेय वुशू स्पर्धेत श्री नागेश विद्यालयाचा श्रेयस सुदाम वराट द्वितीय
जामखेड प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धा 2025-26 नुकत्याच छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.

या स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय जामखेड येथील विद्यार्थी श्रेयस सुदाम वराट याने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात द्वितीय क्रमांक सिल्व्हर (मेडल) पटकावले आहे. श्रेयसच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेचे तसेच जामखेड तालुक्याचे नाव राज्यस्तरावर गौरवाने उंचावले आहे.

याबद्दल विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती रयत शिक्षण संस्थेचे अजीव सदस्य प्रकाश खंडागळे ,प्राचार्य मडके बि के , उपप्राचार्य नाळे एस एन, पर्यवेक्षक जाधवर एस व्ही, गुरूकूल प्रमुख संतोष ससाने एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, साळुंखे बी एस,डुचे सी एच, संभाजी इंगळे,शेटे डी ए, पठाण ए एन, यादव सर ,जाधव एस व्ही, मुरकुटे एम बी, गुट्टे एस एस, चौधरे ए बी,अनारसे एन ए, लटपटे डी व्ही, देशमुख एस एस, रणदिवे एस आर, शिंदे बी एस, पवार एस एस, डाडर एम बी, लोखंडे एस बी, श्रीम शिनगारे एम एस, श्रीम ढाकणे एम एस,श्रीम गोपालघरे जे बी.आजबे व्ही डी, सानप आर एल,श्रीम म्हस्के एम बी , मते मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. श्री नागेश विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व वुशू प्रशिक्षक जायगुडे आबा यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील खेळाडू सातत्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांचा विशेष सत्कारही यावेळी करण्यात आला.

या प्रसंगी प्राचार्य मडके म्हणाले,
“श्रेयसचे हे यश प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे. मेहनत, शिस्त आणि सातत्य या तीन गुणांवर कोणताही खेळाडू मोठं यश मिळवू शकतो. विद्यालय नेहमीच आपल्या खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि भविष्यातही राहील. रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रकाश खंडाळे यांनी श्रेयश ला राज्यस्तरीय सिल्वर मेडल मिळाल्याबद्दल व संस्थेचे व विद्यालयाचे राज्यस्तरावर चमकवले याबद्दल अभिनंदन केले.




