आज जामखेड राष्ट्रवादी काँग्रेसने केले कार्यकत्यांना हे अवहान

जामखेड प्रतिनिधी

शिंदे-फडणवीस सरकारमधील सत्तेची मस्ती व मग्रुरी असलेल्या बेजबाबदार मंत्री अब्दुल सत्तारांंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या नेत्या खा.सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल शिवराळ भाषेत आक्षेपार्ह टीका केली आहे. त्यामुळे सबंध महाराष्ट्रात कार्यकर्ते संतप्त झाले असून सर्वत्र आंदोलने केली जात आहेत.
त्या पार्श्वभूमीवर या मग्रूर मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते’ आज सकाळी 11 वा जामखेड पोलीस स्टेशनला जाणार आहेत.तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे ही विनंती.

मा.राजेंद्र कोठारी प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जामखेड मा.प्रा.मधुकर आबा राळेभात कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष.मा.दत्तात्रय वारे
तालुकाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जामखेड, मा.राजेंद्र गोरे शहराध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जामखेड. मा.उमरभाई कुरेशी तालुकाध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जामखेड. यांनी केली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here