पारदर्शक कारभारामुळे सभासदांनी पुन्हा शिक्षक बँकेचा कारभार आमच्या हतात दिला – बापुसाहेब तांबे

नवनिर्वाचित संचालक संतोष राऊत व विश्वस्त मुकुंद सातपुते यांचा पदग्रहण समारंभ संपन्न

जामखेड प्रतिनिधी

आम्ही उत्तम कारभार केला, प्रश्नांची जाण असणारे चांगले उमेदवार दिले, तसेच संचालकांचे काम सभासद पर्यंत पोहोचणारी टीम बरोबर होती या त्रिसूत्री मुळे व पारदर्शक कारभारामुळे परत बँकेचा कारभार सभासदांनी आमच्या हतात दिला आहे आणि याच संधीचे सोने करण्यासाठी अधिक चांगला कारभार करावयाचा आहे आसे मत शिक्षक नेते बापुसाहेब तांबे यांनी व्यक्त केले.

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत व विकास मंडळाचे विश्वस्त मुकुंद सातपुते यांचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी पदग्रहण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबर पवार माजी शिक्षण विस्तार अधिकारी जामखेड, प्रमुख पाहुणे प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष व गुरुमाऊली मंडळाचे सर्वेसर्वा नेते बापूसाहेब तांबे, जिल्हा अध्यक्ष गुरुमाऊली मंडळ 2015 राजाभाऊ साळवे ,गोकुळ कळमकर कार्यकारी अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ अहमदनगर, साहेबराव अनाप मा.चेअरमन शिक्षक बँक,संतोष दुसंगे मा.चेअरमन शिक्षक बँक,अनिल भवार साहेब मा.विश्वस्त विकास मंडळ संतोष मगर विश्वस्त विकास मंडळ, संदीप मोटे संचालक शिक्षक बँक बाळासाहेब सरोदे संचालक शिक्षण बँक,बाळासाहेब तापकीर संचालक शिक्षक बँक, महेश भनभणे संचालक शिक्षक बँक,नवनाथ दिवटे विश्वस्त विकास मंडळ, गौतम साळवे,प्रदीप बोरूडे,प्रमोद शिर्के, मच्छिंद्र लोखंडे, इकडे सर ,खडे सर ,गिरी सर ,बजरंग गोडसे सर ,आबासाहेब सूर्यवंशी सर, जामखेड मधून महिला तालुका अध्यक्ष निशा कदम,कल्पना गायकवाड,राज्य नेते किसन वराड माजी विश्वस्त गोकुळ गायकवाड, केशव गायकवाड, बाबासाहेब कुमटकर ,हनुमंत गायकवाड ,विनोद सोनवणे ,विकास बगाडे,एकनाथ चव्हाण अध्यक्ष जामखेड तालुका प्राथमिक शिक्षक संघ ,जालिंदर भोगल,श्रीहरी साबळे, शहाज जगताप, मोहन खवळे, सदाशिव भालेराव ,बळीराम अवसरे,नाना मोरे, राजीव मडके, अर्जुन पवार ,रामहरी बांगर, सचिन पवार,गौतम सोले,सतीष सदाफुले, गणेश कात्रजकर, वारे सर,बँकचे शाखाप्रमुख मुकुंद ढवळे व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पुढे बोलताना बापुसाहेब तांबे म्हणाले की विजय मिळवणे खुप सोपे आहे विजय टीकवने अवघड आहे. जो जीता वहीच सिकंदर आसतो सर्व सभासद आपलेच आहेत त्यांना देखील सांभाळुन घ्यायची जबाबदारी आता खुप वाढली आहे. कुठलाही कारभार होत नसतो तो अभ्यास करुन करायाचा आसतो.

 

सॅप्टवेअरच्या बाबतीत नक्कीच बदल केले जातील अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात कमी व्याजदर देणारी बँक म्हणजे आपली शिक्षक बँक आहे. कर्मचाऱ्यांनी देखील ठेवी आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यांना ठेवींचे टारगेट दिले पाहिजे. बँकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत आपल्या पासुन बचत करण्यास सुरवात करा. बँकेत अमुलाग्र बदल केला पाहिजे आम्ही गेल्या आडीच तीन वर्षांत बॅंकेचे उत्पन्न वाढवले आहे.

यापुढे कोणत्याही कार्यक्रमात फेटे आणू नका वायफळ खर्च करू नका फेट्याऐवजी पुस्तक भेट द्या, बँक भीसी म्हणून चालवायची नाही तर एक आदर्श बँक चालवायची आहे. यासाठी नियोजन करावे लागणार आहे तसेच कोणताही निर्णय घेतला तरी विरोधक टिका करणार आहेत त्यामुळे कारभार पारदर्शक करावयाचा आहे.

विकास मंडळाच्या विश्वस्तांनीही चांगल्या ट्रस्ट चा अभ्यास करून काय चांगले करता येईल याचे नियोजन करा आपल्याला चांगले व्हाँस्पीटल उभारावयाचे आहे याचेही नियोजन करावे प्रत्येकाने चांगला अभ्यास करून चांगल्यात चांगले काय करता येईल हे पाहावयाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here